धक्कादायक प्रकार गोंडपिपरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपींवर पोस्को 376 अंतर्गत गून्हा दाखल
गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-तालुक्यातील मौजा वटराना येथील अल्पवयीन मुलीवर खराळपेठ येथील 24 वर्षीय नराधम तरुणांने बलात्कार केल्याची घटना दि.16 जानेवारी रोज रविवारला घडली .
बाजाराचा दिवस असल्याने
अल्पवयीन मूलगी बाजारातून भाजीपाला खेरेदि करून घरी परतत असताना खरालपेठ येथील 24 वर्षीय आरोपी अतुल गोविंदा तावाडे रा.खराळपेठ हे सोमनपली कडे जात असल्याचे सांगत तिला दुचाकीवर बसविले. दुचाकींत पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून खराळपेठ येथील जंगलात नेऊन तिच्या वर बलात्कार केला.
आपली फसवनुक झाल्याचे लक्ष्यात येताच तिने आरडाओरडा केली पण नराधमाने गळा दाबून तिचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला.
अश्यातच ती भाजीपाला ची पिशवी तिथेच टाकून जंगलातून धावत मुख्य मार्गावर येत मदतीची विनवणी करू लागली अश्यातच त्याच मार्गवर पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी थांबवली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
पीडीतिने सदर प्रकाराबाबत गोंडपीपरी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोस्को अंतर्गत आरोपीवर 363,376,376 ab भादवी सह कलम 4,6,8,12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे.
या अगोदर सुद्धा आरोपीवर पोस्को अंतर्गत 376 दाखल असल्याची परिसरात चर्चा आहे.
पुढील तपास सुरू आहे.