माझे गाव माझा अभिमान-नवेगाव वासियानी श्रमदानातून गावाचा चेहरा बदलविला

57

माझे गाव माझा अभिमान-नवेगाव वासियानी श्रमदानातून गावाचा चेहरा बदलविला

माझे गाव माझा अभिमान-नवेगाव वासियानी श्रमदानातून गावाचा चेहरा बदलविला

*प्रदिप मनोहर खापडॅ*
*कान्पा ग्रामीण नागभिड प्रतिनिधी*
*9823834895*

नागभिड-गावातील नागरिकांनी जर विचार करून आणि एकत्रित होऊन गावाचा विकास करतो म्हटला तर गावाला एक नवीन रूप गावकरी देऊ शकतात असे नवेगाववाशीयांनी करून दाखविले की गावात एकी जर केला तर गावाला विकासापासून आणि गावाला विकसित करण्यापासून कोणी रोखू शकत नाही १९जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान “ग्राहनिर्माण महायज्ञ” हा कार्यक्रम आयोजित केला आहे .या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत .सर्व गावकरी लोकांनी विचार केले की कार्यक्रम सुरू सुरू होण्याअगोदर गावात लोकवर्गणी करून आणि श्रमदान करून गावाची साफसफाई करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गावातील तरुण आणि वयस्कर लोक एकत्र आले आणि गावच्या साफसफाईला सुरुवात केली त्यानंतर नवेगाव पासून तर नवेगाव फाट्यापर्यंत च्या रोडवर भरपूर खड्डे पडले होते ते सर्व खड्डे गावकऱ्यांनी बुजवून रोडवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या . एक किलोमीटरचा सर्व रस्ता सुशोभित केला. गावातील मंदिराची रंगरंगोटी करून गावातील रस्त्याच्या कडेला असणारा कचरा साफ केला. आज नवेगाव या गावात गेला की एक वेगळाच अनुभव बघायला मिळतो. गावकऱ्यांनी करून दाखवले की, मनात एक दृढ निश्चयअसला की, गावातील घाण साफ करायला वेळ लागत नाही. असे होणार ग्रामनिर्माण महायज्ञ चे कार्यक्रम. १९ जानेवारीला दुपारी ३ वाजता उद्घाटन सञ, सायंकाळीं ६ वाजता सामुदायिक प्रार्थना,८.३० वाजता किर्तन व प्रवचन,. २० जानेवारीला विषेश बौद्धिक सत्र,२१ जानेवारीला बौद्धिक सत्र,२२ जानेवारीला विशेष राष्ट्रीय किर्तन,२३ जानेवारीला विशेष मार्गदर्शन सत्र,२ वाजता समारोपीय कार्यक्रम,४ वाजता श्रद्धांजली व सामूहिक पार्थना