कुही नगर पंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्रदिपक यश. एका सदस्यावरुन चार सदस्यावर मारली मजल

48

कुही नगर पंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्रदिपक यश.

एका सदस्यावरुन चार सदस्यावर मारली मजल

कुही नगर पंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्रदिपक यश. एका सदस्यावरुन चार सदस्यावर मारली मजल

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442

नागपुर:- कुही नगरपंचायत निवडणुकित राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले आहे त्यामूळे कुही मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज मिळालेला विजय हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाभाऊ गुजर, ओबीसी आघाडिचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश सचिव अविनाश गोतमारे यांनी घेतलेल्या प्रचार सभेचे फलीत आहे. उमरेड विधान सभा क्षेत्राचे नव्यानेच नियुक्त करण्यात आलेले अध्यक्ष विलास झोडापे यांनी कुही नगर पंचायत निवडणुकिचे स्विकारलेले आवाहन व मागिल दोन महिन्यांपासुन घेतलेली प्रचंड मेहनत, मतदारांत पक्षाप्रती निर्माण केलेला विश्वास व कार्यकर्त्यांत जागविलेली चेतना, त्याचे हे फलीत आहे. महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई हरडे, डॉ. शेनडवरे, कुंडलीक राऊत, भागेश्वर फेंडर, दिनेश साळवे, शहर अध्यक्ष रमेश लांजेवार, कार्याध्यक्ष गजानन लांजेवार, आशिष आवळे, अमोल वासनिक, विष्णु मांढरे, सुषमाताई देशमुख आदी प्रमुख मंडळी पक्षाच्या उमेदवारांच्या पाठिशी खंबिरपणे व एकजुटिने उभे राहिलेत, त्याचे हे फलीत आहे. असे उदगार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भावना व्यक्त केल्या.