अमरावती चिमुकलीचा अपघातात मृत्यु.
एका चिमुकलीचा अपघातात मृत्यु झाल्याची हृदय हेलवनारी घटना घडली आहे.
अमरावती :- चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. छत्री तलाव ते महादेवखोरी मार्गावर सोमवारी (ता. २) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
छत्रीतलाव ते महादेवखोरी मार्गावरील बेड्यावर जितेंद्र साकचंद भोसले हे पाल टाकून वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुलगी घरासमोर रस्त्यावर खेळत असताना भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाची तिला जोरदार धडक बसली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. फ्रेजरपुरा पोलिसांनी जितेंद्र भोसले यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या वाहनचालकाचा शोध सुरुवात केली आहे.