रहिवासी उपयोगाकरीता पट्टे मिळण्याबाबत-समता सैनिक दलाचे तहसीलदारांना निवेदन

रहिवासी उपयोगाकरीता पट्टे मिळण्याबाबत-समता सैनिक दलाचे तहसीलदारांना निवेदन

रहिवासी उपयोगाकरीता पट्टे मिळण्याबाबत-समता सैनिक दलाचे तहसीलदारांना निवेदन

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

दिनांक १७/११/२०२१ रोजी तहसीलदार वर्धा यांचे कार्यालयात मौजा सिंदी(मेघे)येथील सर्वे क्रमांक १५८/१मध्ये राहणाऱ्या नागरीकांशी झालेल्या चर्चेदरम्यान मा.तहसीलदार यांनी विद्यमान सरपंच प्रिती सवाई व ग्रामसेवक रंगारी यांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याबाबत समता सैनिक दल वर्धाच्या वतीने तहसीलदार,वर्धा यांना निवेदन देण्यात आले.
मौजा सिंदी(मेघे)येथील सर्वे क्रमांक १५८/१ येथे अनेक वर्षांपासून राहत असलेले नागरिक ज्यात अपंग,निराधार व व्रुध्द शेतमजूर आपल्या कुटुंबाची गुजरान करीत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते स्वतः चे नावे प्लाँट किंवा जागा खरेदी करु शकत नाही. त्यामुळे ते या खाली जागेवर झोपड्या बांधून अधिवास करीत आहेत.
सर्व बाब सुरळीत सुरू असतांना दिनांक ८/११/२०२१ रोजी सिंदी(मेघे)ग्रामपंचायतकडून त्यांना ७दिवसांचे आत झोपडपट्टी हटविण्यास नोटीस बजावण्यात आला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी दिनांक १७/११/२०२१रोजी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे, महिला प्रतिनिधी सौ वासनिक, सिंदी(मेघे)ग्रा.प.सरपंच प्रिती सवाई, उपसरपंच शेखर येंडे,सदस्य उत्कर्ष देशमुख, सौ.चंदा कुंभलकर,सौ.महाकाळकर,जि.प.सदस्य मनिष फुसाटे आदी मान्यवर यांचे उपस्थितीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती आपण ग्रा.प.सरपंच व ग्रामसेवक यांना दिड महिन्याचे आत झोपडपट्टी वासीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. असे आदेश दिले होते. त्यावर वरील दोन्ही पदाधिकाऱ्यांनी होकार दिला होता. परंतु दिड महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यावरही त्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही आणि आपल्या आदेशाचा अवमान केला आहे. हि अत्यंत निंदनीय बाब आहे.

आमच्या समोर पर्याय नसल्यामुळे आम्ही त्याच ठिकाणी राहात आहोत. आम्ही राहात असलेल्या वसाहती मध्ये ग्रा.प.कडून अजूनही विद्युत दिवे आणि पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही किंवा मुलभूत सोयी उपलब्ध करून दिलेल्या नाही. त्याचप्रमाणे अनेक रहिवासी नागरिकांना शासकीय योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले.मात्र त्यांचे नावे जागा किंवा पट्टे नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आपण जर पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ शकत नसाल तर आम्ही आज आहोत त्याच ठिकाणी प्लाँट पाडून देण्यात यावे आणि शासकीय योजनेसह मुलभूत सुविधांचा लाभ देण्यात यावा.
असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन सादर करतांना समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक अभय कुंभारे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत, वंदना वासनिक, रत्नमाला रामटेके, चंद्रकला पखाले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here