नगर पंचायतीच्या निवडणुकित या उमेदवाराला पडले चक्क शुन्य मतदान

61

गोंडपिपरी तालुक्यातील नगर पंचायतीचा निवडणुकित या उमेदवाराला पडले शुन्य मतदान

गोंडपिपरी तालुक्यातील नगर पंचायतीचा निवडणुकित या उमेदवाराला पडले शुन्य मतदान

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी:- तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्या जाव्यात काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याची मटण विरोधकांनी चोरली. या घटनांनी मतदाराचे चांगलेच मनोरंजन केले. आता निकाल जाहीर झाला. या निकालात एका उमेदवार चक्क शुन्य मतदान मिळाले.

या उमेदवाराने स्वताच मतही स्वताला दिलं नाही. भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या या उमेदवाराने बंडखोरी केली होती. मात्र वरीष्ठानी समजूत काढल्याने उमेदवाराने स्वताचा प्रचार केला नाही.
चंद्रपुर जिल्ह्यात सहा नगर पंचायतीचा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत गोंडपिपरी शहरात घडलेल्या मनोरंजक घटनांनी जिल्हाचे लक्ष वेधले. तालुक्यात दोन सख्या जावा एकमेकांच्या विरोधात उभ्या झाल्या होत्या. तर कार्यकर्त्यांना मटणाची मेजवानी देणाऱ्या उमेदवाराची सात किलो मटण विरोधकांनी लंपास केलं. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केलं. आता निकाल जाहीर झाले आहेत. आलेल्या निकालात एका उमेदवाराला शुन्य मतदान मिळालं.

या उमेदवाराने स्वताचं मत स्वतालाच दिलं नाही. जितेंद्र इटेकर असं उमेदवाराच नाव आहे. वार्ड नंबर दोन मधून एससी प्रवर्गातून उमेदवारी इटेकरनी दाखल केली होती. इटेकर भाजपाचे कार्यकर्ता आहेत. त्यांनी पक्षाला उमेदवारी मागीतली मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इटेकर अपक्ष म्हणून राजकीय रिंगणात उतरले. मात्र पक्षातील पदाधिकार्यांनी समजूत काढल्याने त्यांनी स्वताचा प्रचार केला नाही. स्वताचे मतही स्वताला दिले नाही. मात्र शुन्य मतदान मिळवणारे इटेकर जिल्ह्यातील पहीले उमेदवार ठरले आहेत.