वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत वाढ

57
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत वाढ

मीडियावार्ता टीम
२२ जानेवारी २०२२:

मुंबई, दि. 22: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नव्याने वाढविण्यात आलेली महाविद्यालय निहाय प्रवेश क्षमता याप्रमाणे आहे.

मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. नेफ्रॉलॉजी (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ 1 वरुन 3 करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.ॲनेस्थेसियोलॉजी (MD Anesthesiology) या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता चार असणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. जनरल मेडिसीन (MD General Medicine) आणि एम.एस.जनरल सर्जरी या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे तीन वरुन सहा आणि तीन वरुन पाच इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी मायक्रोबॉयलॉजी (M.D. Microbiology), एम.डी पॅथोलॉजी (M.D. Pathology), एम.डी फार्माकॉलॉजी (M.D. Pharmacology), एम.डी रेसपीरेटरी मेडिसीन (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 3, 4,3 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी ॲनेस्थेसियोलॉजी (M.D. Anaesthesiology), एम .डी (M.D. Otorhinolarynegology), एम.डी जनरल मेडिसीन (M.D. General Medicine), एम.एस जनरल सर्जरी (M.S. General Surgery), एम.एस अबस्टेट्रीक्स आणि गॉयनाकॉलॉजी (M.S.Obstetrics & Gynaecology), एम.डी बॉयो केमिस्ट्री (M.D. BioChemistry), आणि एम.एस ऑपथलमोलॉजी (M.S. Opthalmology),  या 7 अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4.3.9.3.3.4 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.

एम.डी रेडिओ डॉयगॉनासिस (M.D. Radio- diagnosis) आणि एम.डी पेडियॉट्रीक्स (M.D. Paeduatrics) या 2 विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 5 वरुन 6 आणि 4 वरुन 6 इतकी वाढ करण्यात आली आहे.

 लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी डरमॅटोलॉजी, वेनेरीओलॉजी आणि लेप्रोसी (M.D. Darmatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील  विद्यार्थी प्रवेश क्षमता 3 असणार आहे.

 पुण्यातील बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी ईमरजंन्सी मेडिसीन (M.D Emergency Medicine), हा अभ्यासक्रम 3 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.