हत्या की आत्महत्या ?
वढोलीत पसरली शोककळा

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी :-तालुक्यातील मौजा वढोली येथील 23 वर्षीय युवकांचा मृतदेह गळफास अवस्थेत आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. युवकाचे नाव शुभम पुंडलिक चूधरी वय 23 रा.वढोली असे आहे. पडोलीला मामाकडे राहून येथीलच एका खाजगी कंपनीमध्ये काम करीत होता. चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. या बाबत पडोली पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.
अश्यातच आज दि.23 जानेवारी रोज रवीवारला चंद्रपूरातील लालपेठ भागातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वाल कंपाऊंड लगत असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शुभमचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुभम ची हत्या की आत्महत्या हे गुलदस्त्यात असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
शुभम च्या वडीलानी सुद्धा कर्जबाजारीपणामुळे आठ वर्ष्या पूर्वी आत्महत्या केली होती.
त्यावेळेस कुटुंबात शुभम, आई आणि त्याची बहीण मिळून कसे बसे कुटूंब चालवत होते. बहिणीचे लग्न झाले. कामानिमित्त शुभम शहराकडे कामाला आला.वडिलांचे दुःख कसे बसे विसरत जीवन जगत असताना आज शुभम चा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने चूधरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वढोली गावावर शोककळा पसरली आहे.