महाराष्ट्रातील ” या ” गावात मृतदेह जाळायला जागाच नाही ; ! स्मशान भूमी तर सोडाच पण खुली जागा देखील नाही

54

महाराष्ट्रातील ” या ” गावात मृतदेह जाळायला जागाच नाही ; !

स्मशान भूमी तर सोडाच पण खुली जागा देखील नाही

महाराष्ट्रातील " या " गावात मृतदेह जाळायला जागाच नाही ; ! स्मशान भूमी तर सोडाच पण खुली जागा देखील नाही

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- विकासाचा उंच उंच उड्या मारल्याचा बतावण्या लोकप्रतिनी अन प्रशासन करीत असले तरी खेड्यागावांचे प्रश्न मात्र दुर्लक्षितच आहेत.अनेक गावात मृतदेह जाळायलाही हक्काची जागा नाही. आज पहाटे गावातील एका वृध्दाचे निधन झाले.कुटूंबिय दुख विसरून आता मृतदेह कुठे जाळायचा ? या विचारात पडले आहेत.कुटूंबियांनी सरपंचाची भेट घेतली.सरपंचही हतबल.ही वेळ कशीबशी भागऊ या..! यापलीकडे तेही काही बोलू शकले नाही.ही विदारक स्थिती चंद्रपूरातील गोजोली या गावात उद्भवली आहे.
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणारे गोजोली हे लहानसे गाव.गावाची लोकसंख्या जेमतेम बाराशे.गावाचा मुख्य व्यवसाय शेती,मजूरी.या गावाला हक्काची श्मशानभुमी नाही.श्मशानभुमीचा जागेवर अतिक्रम झाले आहे.त्यामुळे गावातील मृतदेह गावालगत असलेल्या पडीत जमिनीत जाळल्या जायचे.साधारणा पाच वर्षापुर्वी पडीत जागेवर वनिकरण झाले.त्यामुळे मृतदेह जाळायला गावाला जागाच उरली नाही.या पाच वर्षाचा कालावधीत कुटूंबातील व्यक्ती दगावला तर कुटूंबिय स्वताचा शेतात किवा मालकी जागेवर मृतदेह जाळत असतं.