घुबडाला जीवनदान देणाऱ्या स्वप्निल अलगदेवे, प्रा. सुयोग बाळबुधे यांचे सर्वत्र कौतुक

कृष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
📱 9545462500📱
ब्रम्हपुरी :- बुधवार सकाळी येन प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर ब्रम्हपुरी शहरातील पेठवार्ड जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एक घुबड पडून असल्याची माहिती पक्षीप्रेमी स्वप्नील अलगदेवे यांना मिळाली. घटनास्थळी त्यांनी जाऊन त्या साधारण चार पाच किलो च्या मोठ्या घुबडाला पाणी पाजले. त्यास मुक्त केल्यानंतर घुबडाला उडता येणे शक्य नसल्याचे यांच्या लक्षात आले. त्यांनी या भागातील वनरक्षक गजानन कागणे यांना पाचारण केले.

घुबड मिळून आल्यानंतर या घटनेची एकच चर्चा परिसरात सुरू आहे. जंगलात पक्ष्यांना व प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.असेच अनेक वन्यजीव गावशिवारात भटकंती करताना शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहेत. एका दुर्मीळ जातीच्या घुबडाला प्राणिमित्र स्वप्नील अलगदेवे, प्रा सुयोगकुमार बाळबुधे, गोलू रंधये, गणेश बुराडे यांनी वनरक्षक गजानन कागणे यांच्या ताब्यात देऊन त्यास जीवदान दिले आहे.