
सिद्धांत
२६ जानेवारी २०२२: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिल्ल्लीतील जनपथवर पार पडले. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, सीमा सुरक्षा दलाचे उंटदल, रणगाडे, आकाश क्षेपणास्त्र, युध्द टँक, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथकांची आकर्षक पेशकश उपस्थितांचे आकर्षण ठरले. तसेच देशभरातल्या विविध राज्यांनी आपल्या राज्यांची माहिती दर्शविणारे चित्ररथांचे संचलनात सादरीकरण केले.
कोरोनामुळे ह्यावर्षी फक्त १२ राज्यांना आपले चित्ररथ सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचादेखील समावेश होता. कसे होते या १२ राज्यांचे चित्ररथ? चला पाहूया.
छत्तीसगढ: Godhan Nyay Yojana: A New Path To Prosperity
अरुणाचल प्रदेश:Anglo-Abor (Adi) Wars
हरियाणा: Number one in sports
गोवा: Symbols of Goan heritage
गुजरात: Tribal freedom movement of Gujarat
जम्मू काश्मीर: Changing face of Jammu & Kashmir
कर्नाटक: The cradle of Traditional Handicrafts
मेघालय: tribute to women-led cooperative societies and SHGs
पंजाब: Punjab’s contribution in freedom struggle
उत्तर प्रदेश: Odop and Kashi Vishwanath Dham
उत्तराखंड: Pragati ki aur badhta Uttarakhand
महाराष्ट्र: Biodiversity and State Bio-Symbols of Maharashtra
भारत सरकारच्या https://www.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2022/ या वेबसाईटवर जाऊन भारतीय नागरिक आपल्या आवडीच्या चित्ररथाला आपले मत देऊ शकतात. ३१ जानेवारीपर्यंत याबाबतचे मतदान चालू असेल. महाराष्ट्राने २०१५ आणि २०१८ साली सर्वोकृष्ट चित्ररथाच्या पुरस्कार पटकावला होता. ह्यावर्षी राज्यातील जैवविविधततेचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.