भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

56

अपघातामध्ये जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू

भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

नंदलाल एस. कन्नाके
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं. ७७४३९८९८०६

गडचिरोली दि. २७ जानेवारी:- आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील रंगमोचन फाट्यानजीक ट्रक्टर व कारच्या भीषण अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे

आज सकाळच्या सुमारास चामोर्शी वरून स्वतःच्या कार नी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यार पवार व भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यार पवार हे दोघे बांधव आपल्या वैयक्तिक कामासाठी नागपूरला जात असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रंगमोचन फाट्याजवळ कार क्रमांक MH 33 V 245 ने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

यात कार मधील भाजपाचे जिल्हा सचिव आनंद गण्यार पवार जागीच ठार झाले तर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जि. प. चे माजी कृषी सभापती अतुल गण्यार पवार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टरचे दोन भाग झाले.

घटनेची माहिती पोलीस विभागाला माहीत होताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा अधिक तपास केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत पोहचविली. अतुल गण्यार पवार यांना अधिक उपचारासाठी नागपुरात हलविले जाणार असल्याची माहिती आहे.

सदर घटनेचा वृत्त गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात माहित होताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.