नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून द्या परिसरातील नागरिकांची मागणी

54

नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून द्या

परिसरातील नागरिकांची मागणी

नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून द्या परिसरातील नागरिकांची मागणी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी:- तालुक्यातील जवळपास हजारो नागरिकांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात केशरी शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या.
परंतु मागील नऊ महिन्यांपासून ह्या गरजवंत केसरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला असल्याचे दिसून येत आहे.त्यामूळे त्या सर्व गरजवंत केसरी शिधापत्रिकाधारकांना शासन दरानुसार धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्यास्थितीत कोरोणाची तिसरी लाट सुरु असून बऱ्याच नागरिकांचा रोजगार, व्यवसाय पुनश्च एकदा डबघाईस आला आहे.
अशा बेताच्या परीस्थितीत गरजू नागरिकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. परंतु शासनाच्या सुस्त कारभारामुळे गरजू नवीन शिधापत्रिकाधारक नागरिकांना धान्य पुरवठा होऊ न शकल्यामुळे त्यांची उपासमार होऊन वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे.
त्यामुळे नवीन शिधापत्रिकाधारकांना शासनाने विशेष लक्ष देऊन अतीतात्काळ धान्य उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करतांना दिसत आहेत.