जि. प.ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग, पवनी येथून साकोलीला हलविण्याचा विरोध

52

जि. प.ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग, पवनी येथून साकोलीला हलविण्याचा विरोध

जि. प.ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग, पवनी येथून साकोलीला हलविण्याचा विरोध

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/पवनी:-पवनी तालुक्यातील मागील 15 वर्ष पासून कार्यरत असलेले आणि कुणालाही त्रास नसलेले उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा, उपविभाग,पवनी येथील कार्यलय, पवनी येथून साकोली येथे हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून काही समान हलविण्यात आलेले आहे.याविषयी जो पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, पवनीची सत्ता स्थापन होई पर्यन्त सदर कार्यलय हलविण्याचा प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी मागणी सरपंच संघटना आणि शिवसेना ,पवनी शहर यानी केलेली आहे.सदर कार्यलय ला सरपंच संघटना, तालुका-पवनी आणि शिवसेना, पवनी शहर यांनी कार्यालयच्या गेट ला आपआपले कुलूप ठोकले.
सदर कुलूप ठोको दरम्यान भंडारा जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष श्री यादवराव मेंघरे, श्री सतीश घरडे,श्री किशोर ब्राम्हणकर, श्री धिरज गायमुखे,श्री राहुल काटेखाये,श्री ओरमोड डोये आणि शिवसेना श्री अनिल धकाते,श्री देवराज बावनकर, श्री शंकर भुरे,श्री गणेश मुंडले,श्री मनीष आचार्य,श्री राहुल नंदनवार,श्री दीपक भांडारकर, श्री नरेंद्र भांडारकर आदी कार्यकर्ते हजर होते.