पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली पोलीस अधिक्षक वसंत जाधव

53

पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली
पोलीस अधिक्षक वसंत जाधव

पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली पोलीस अधिक्षक वसंत जाधव

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /भंडारा :- सदरक्षणाय खलनिग्रणाय हा बीद्र घेऊन पोलीस सेवेत आयुष्याची अनेक वर्ष घालविणारा प्रत्येका क्षण हा समाजाचे रक्षण व दुर्जनांचा विनाश नुसार समाजातील सर्वच वर्गातिल लोकांची सेवा करण्याची
संधी मला लाभली तिचे सोने करण्यासाठी मी सदैव शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेन असे प्रतिपादन आंतराष्ट्रीय मानवाधिकार समिती विदर्भ व भंडारा जिल्ह्याच्या वतीने पोलीसअधिक्षक वसंत जाधव
यांचा विशेष उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी आपले मतव्यक्त केले.
आपल्या मनोगतातुन त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समीतीचे कौतुक केले. संपूर्ण भंडारा जिल्ह्याची ओळख असलेले समाजशील प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालकच्या वतीने त्यांना आय.पी.एस.दर्जा देण्यात आला.ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व गैरवाची बाब असल्याने विदर्भ व भंडारा जिल्हाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी त्यांनी आपल्या कार्यालयात हा सोहळा न घेता बाहेरील परिसरात घडवून आणुन आनंदनशात असल्याचा भास झाल्याचे कथर केले.
कोरोना काळात स्वता:ची पत्नी गमावुन बसलेल्या या प्रशासकीय अधिकाऱ्याने खचुन नजाता समाजात योग्य प्रशासकीय सेवा देयासाठी अहोरात्र परिसर करून देशसेवा करण्याचे वसा त्यांनी घेतला. या प्रसंगी ते भारावुन गेले होते. अनेक पुरस्कारापैकी आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेला हा पुरस्कार व मानसन्मान माझा आयुष्यात फार महत्वाचा व प्रेरणादायी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला विदर्भ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे अध्यक्ष चेतन बोरकर हे होते. तर जिल्हा भंडारा जिल्हा महासचिव प्रा.युवराज खोब्रागडे, जिल्हा अध्यक्ष संतोष मडावी, जिल्हा माहिलाअध्यक्ष अँड. नेहा शेडे, जिल्हा कायदेशीर सल्लागार अॅड. नितीन बोरकर, जिल्हा मार्गदर्शक अँड. शुभांगी नंदनवार, कुणाल नागोसे, रोशन हुकरे, कैशिक साखरवाडे, शोएब अंसारी, शरद हेडाऊ, डॉ पौर्णिया वाहाणे, स्वाती हेडाऊ, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्याचे संचालन जिल्हामहासचिव प्रा. युवराज खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विदर्भ अध्यक्ष चेतन बोरकर यांनी केले.