संविधान निर्माते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करून ‘भारतीय लोकसत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

55

संविधान निर्माते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करून ‘भारतीय लोकसत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

संविधान निर्माते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करून 'भारतीय लोकसत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ९८६९८६०५३०
मुंबई : – २६ जाने. १९५० रोजी भारतीय संविधान लागु करण्यात आले. तो दिवस आपण लोकसत्ताक दिन म्हणून देशभर साजरा करतो. या लोकसत्ताक दिनानिमित्त आम्ही संविधानाच्या प्रचार प्रसारासाठी व लोकसत्ताक दिवस मोठया प्रमाणात जनतेमध्ये साजरा करण्यासाठी देशात बंधुत्व व शांततेचा संदेश पोहचहवण्यासाठी तसेच आज देशामध्ये धार्मिक, जातीय, भाषिक, प्रांतिक दंगली घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘भारतीयत्व हेच बंधुत्व’ हा संदेश देण्यासाठी दर वर्षी “संविधान रॅलीचे” आयोजन गेले दहा वर्ष केले जाते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता आणि प्रशासन यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर रॅली न काढता.

मी भारतीय…!
भारतीय गणराज्य बलशाली घडवणे हे माझे धेय्य…!

ही टॅग लाईन घेऊन,भारतीय लोकसत्ताक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी संविधान निर्माते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे प्रत्येक विभागात वाचन करण्यात आले.

२६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता माता रमाबाई कॉलोनी घाटकोपर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात  आले. तसेच भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा. अमोलकुमार बोधिराज सर यांनी लोकसत्ताक दिनाचे महत्व तसेच तो दिवस देशातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हे पटवून सांगितले. त्याच बरोबर संविधानाची अंमलबजावणी होण्यास तसेच संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यास आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया.

तसेच तिथून पुढे भीमवाडी गोवंडी येथे संघटनेचे स्वागत करण्यात आले,पी एल लोखंडे मार्ग येथे ‘वादक महासंघ’  यांच्या तर्फे ‘रक्तदान शिबिर’ तसेच समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून रक्तदात्यांचे मनोबल वाढवले तसेच संविधान आणि लोकसत्ताक दिनाच्या सदिच्छा दिल्या तसेच वादक महासंघाने संघटनेला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची फ्रेम देऊन स्वागत केले संघटनेच्या कार्याचा आढावा घेत सन्मान केला त्याबद्दल वादक महासंघाचे अध्यक्ष रमेश काळे ,सुनिल रुपेकर, सचिन कांबळे,बाळा जाधव ,सागर कांबळे आणि त्यांचे सहकारी तसेच चेंबूर आर्टिस्ट ग्रुप यांचे आभार व्यक्त करण्यात आले, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान , दादर चैत्यभूमी, माता रमाई स्मारक ,  कुपरेज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

संघटनेतील सर्व कार्यकर्ते यांनी आपली मते व्यक्त करत सदिच्छा दिल्या तसेच नवीन स्टडी सेंटरचे अनावर होणार आहे.याबद्दल माहिती देण्यात आली.उपस्थित कार्यकर्यांचे स्वागत व आभार मानून  रॅलीचा सांगता करण्यात आला.अमोलकुमार बोधिराज, अमोल साळुंखे, सनी कांबळे,मंगेश खरात,वैभव मोहिते,मनिष जाधव, अजय तायडे,सुप्रिया मोहिते- जाधव,नितीन सातपुते, सुशांत जाधव,आनंद नवतुरे,दिनेश बोधिराज,अभिषेक कासे, प्रदीप साळवे,रोहित कांबळे, प्रेमसागर बागडे,सुजल धाबे,पिलाजी कांबळे,कमलेश मोहिते,सुषमा सावंत,योगेश कांबळे,कल्पेश पवार,
रॅलीला सहभागी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित दर्शवली होती .