आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने केले रद्द. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. श्री.किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांना भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा.

57

आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने केले रद्द.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. श्री.किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांना भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा.

आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने केले रद्द. चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. श्री.किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांना भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा.

सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
✍सागर अलोने✍
9637565247

सिंदेवाही : -भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केलं.

या 12आमदारांमध्ये चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. श्री. किर्तीकुमार (बंटि)भांगडीया यांचेनावं समाविष्ट होते. त्यामुळे चिमूर परिसरामधील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून चिमूर
भांगडीया वाड्यात आ. बंटी
भांगडीया यांना अभिनंद तथा शुभेच्छा देण्यात आल्या.

स्वतःच्या सोयीनुसार राज्यसरकार मनमानी प्रमाणे कारभार करत आहे. आणि विदर्भावर होणार्‍या
अन्यायाविरुद्ध आम्ही येणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे आवाज उचलू असेही आमदार भांगडीया यांनी म्हटले आहे.