
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – ९७६८५४५४२२
पिंपरी चिंचवड: इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध मार्गांचे अवलंबन तरुणाई करताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवायच्या नादात तरुण-तरुणींकडून व्हिडीओच्या माध्यमातून आक्षेपार्ह शिवीगाळ केली जात आहे. याच प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील १८ वर्षीय दोन तरुणींना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून आक्षेपार्ह शिवीगाळ करणाऱ्या साक्षी श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी काश्यप (१८) या दोन तरुणींवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच कुणाल कांबळे याच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरून धमकीवजा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे सदरचे व्हिडीओ हे नीतीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याने या तिघांवर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, अपल पोलीस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार दिपक भोसले, कल्पेश पाटील, अतीक शेख, विनायक म्हसकर यांनी केली.