राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील मुलींची चिडीमारी करणाऱ्या मुलांवर कार्यवाही करण्याची मागणी
खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतिनीधी
8378848427
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राजुरा पोलिस स्टेशनला निवेदन
राजुरा येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह असून सदर वासितिगृहात 70 ते 80 आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. वसतिगृहातून शाळेत जातांना सोनिया नगर, रमानगर येथील काही मुले मुलींना बाईकने कट मारून मुलींची छेड काढत असून या कृत्यामुळे मुलींना नाहक त्रास होत आहे. सदर मुले गांजा, व दारू पिऊन असे कृत्य करीत असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महिपाल मडावी व शुभम आत्राम नितीन सिडाम रवींद्र आत्राम यांनी राजुरा पोलीस स्टेशनला निवेदनातून दिली असून शाळकरी मुलींना संरक्षण देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.