पालांदूर व परिसरात ताप,सर्दी खोकल्याचे आजार बळावले खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी

57

पालांदूर व परिसरात ताप,सर्दी खोकल्याचे आजार बळावले

खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी

पालांदूर व परिसरात ताप,सर्दी खोकल्याचे आजार बळावले खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसला तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.परिसरासह जिल्हाभर दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण निघणे सुरूच आहे.वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे सध्या पालांदूर परिसरातील अनेक गावांत ताप, सर्दी,खोकला आदी आजार बळावल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीचे रुग्ण आढळून येत आहेत.पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता रुग्ण गेल्यास येथील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी त्यांचेशी संबंधीत व्याधीचे उपचार न करता प्रत्येक रुग्णाला कोरोना अँटीजेन तपासणी करण्याकरीता ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवत असल्यामुळे भितीपोटी हे आजारी रुग्ण खासगी रुग्णालयांकडे धाव घेत असल्याने सध्या ही खासगी रुग्णालये सुध्दा हाउसफुल असल्याचे दिसून येत आहेत.

लाखनी तालुक्यातील मोठी बाजारपेठ व व्यापारपेठ आहे. त्यामुळे पालांदुर नेहमी गजबजलेले असते.
लगतच्या लाखांदूर, साकोली व पवनी तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने पालांदूर येथील मुख्य मार्गावर नेहमीच वर्दळ असते.
दरम्यान कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यावर टाळेबंदित शिथिलता येताच कोरोणासंबंधीचे कोणतेही नियम न पाळता नागरिक सैराट आहेत.
सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नुकताच दोन हजाराचा आकडा पार केला असून बधितांची संख्या वाढतीवरच आहे. त्यातल्या त्यात कोरोणा चाचणीसाठी नागरिक पुढे येत नाहीत.भीतीपोटी त्यांचा ओढा खासगी रुग्णालयांकडे वळत असल्याचे दिसते.
पुन्हा खबरदारी न घेतल्यास अजून परिसरासह जिल्ह्यात कोरोणाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

*नागरीक विनामास्क*
कोरोनाचे संकट गडद असतानाही नागरिक गंभीर दिसत नाहीत.
स्थानिक प्रशासनासह
तालुका आपत्ती व्यवस्थापनाने अजून पर्यंत त्रिसूत्रीची अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारलेला नाही.
नागरिक पालांदूर व बाजारचौक परिसरात
विना मुखाच्छादनाने सर्रास वावरताना दिसून येत आहेत.
एकंदरीत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन,महसूल विभाग,आरोग्य विभाग विना मुखाच्छादनाने फिरणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत फारसे गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव वाढण्यास हे कारण सबळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

*व्यापारी, व्यवसायिक व नागरिकांचा नागपूर शहराशी दररोज संपर्क*

विविध आजारांची साथ व कोरोना रुग्ण संख्याचा आकडा वाढत असतानाही नागरिक या बाबतीत मात्र फार गंभीर दिसत नाहीत.
अलीकडेच पालांदूर व परिसरातील व्यापाऱ्यांचा दररोज नागपूर शहराशी संपर्क येत असतो.
नागपुरात कोरोणा व ओमायक्रौनचे रुग्ण आढळून येत आहेत.
येथील अनेक व्यावसायिक व नागरिक नागपूरला येत जात आहेत.
या पार्श्वभूमीवर येथे कोरोना व ओमायक्रॉनचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.