सुनिल बांते यांची काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड

51

सुनिल बांते यांची काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड

सुनिल बांते यांची काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी:लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंचायत समिती लाखनीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते म्हणून सुनील बांते यांची एकमताने निवड करण्यात आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वानुमते सुनील बांते यांची निवड करण्यात आली.

लाखनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू निर्वाण यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. शफ़ीभाई लद्धानी, मा. राजू पालीवाल, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत निंबार्ते, माजी जि. प. सदस्य मा. आकाश कोरे तथा पक्षाचे नवनिर्वाचित पं. स. सदस्य विकास वासनिक, रविंद्र (दादू) खोब्रागडे, प्रणाली सार्वे, योगीता झलके, मनिषा हलमारे, अश्विनी कान्हेकर मोहतुरे, उपस्थित होते.

सुनील बांते लाखोरी गावचे माजी सरपंच आहेत, तालुक्यात राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही सुपरिचित असे नाव त्यांचे आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.