मोहता मिल कामगारांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

59

मोहता मिल कामगारांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

मोहता मिल कामगारांचे तहसील कार्यालयासमोर साखरी उपोषण. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात कामगारांचे साखळी उपोषण. एन.सी.एल.टीने मिल चालू करण्याबाबत तसेच केलेल्या कामाचा तीन महिन्याचा पगार व नियमाप्रमाणे थकीत बोनस देण्याबाबत कामगारांचे उपोषण.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट:- ३० जानेवारी २०२२

मोहता मिल हिंगणघाटच्या कामगारांचे तहसील कार्यालयासमोर त्यांच्या मागण्यांसाठी साखरी/आमरण उपोषण २४ जानेवारी २०२२ पासुन माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांच्या नेतृत्वात सुरु आहे.त्या उपोषण मंडपाला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी भेट दिली व त्यांच्या सोबत पुढील लढ्याबाबत चर्चा केली.

कामगारांच्या प्रमुख मागण्या आहे की बंद असलेले मोहता मिल पूर्ववत चालू करण्यात यावे.कंपनी एन.सी.एल.टी मध्ये गेली असून एन.सी.एल.टी ने कंपनी चालू करण्यात यावी परंतु अद्याप चालु करण्यात आलेली नाही. तसेच मार्च,एप्रिल व मे 2021 मध्ये केलेल्या कामाचा त्वरित पगार देण्यात यावा. या बाबत नागपूर हायकोर्टनी तीन महिन्याच्या आत कामगारांचा पगार देण्यात यावा असे आदेश दिले असताना.ती मुदत १६ डिसेंबर २०२१ला संपली असून मिल चालकांनी कामगारांना तीन महिन्याचा पगार दिला नाही.तो पगार देण्यात यावा तसेच २०२० ते २०२१ वर्षाचे नियमा प्रमाणे थकित बोनस देण्यात यावा. या सर्व मागण्यांसाठी कामगारांचे साखरी/आमरण उपोषण सुरू आहे.

उपविभागीय अधिकारी हिंगणघाट तसेच जिल्हाधिकारी वर्धा यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की मोहता इंडस्ट्रीज हिंगणघाट ही मार्च २०२१ मध्ये कामगारांच्या तीन महिन्याचा पगार व अर्धा बोनस न देता काम देणे बंद केले, तेव्हापासून कामगार बिना कामाने व बिना पगाराने आपले जीवन जगत आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ, हिंगणघाटने कामगारांना त्यांनी काम केलेल्या कामाचा पगार देण्यात यावा यासाठी नागपूर हायकोर्ट मध्ये केस केली असता कोर्टाने सुद्धा तीन महिन्यात कामगारांना पगार देण्यात यावा असा आदेश दिला त्याची मुदत दिनांक १६ डिसेंबर २०२१ ला संपली असून कंपनी चालकांनी आतापर्यंत कामगारांना तीन महिन्याचा पगार दिलेला नाही, तसेच कंपनी सुरू करून आम्हास रोजगार देण्यात यावा कंपनी एन.सी.एल.टी मध्ये गेली असून कंपनी सुरू करण्यात येईल असे वेळोवेळी सांगण्यात आले आहे, परंतु अद्याप कंपनी सुद्धा सुरू करण्यात आलेली नाही.

कामगार सुमारे १२ महिन्यापासून पगार मिळेल या आशेवर आहे, त्यामुळे कामगारांची परिस्थिती फारच दयनीय झालेली आहे, कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न तसेच परिस्थिती अभावी कामगारांच्या मुलांचे लग्न सुद्धा होऊ शकले नाही.अशी गंभीर परिस्थिती कामगारांवर आली असून उपासमारीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कामगारांच्या परिवाराचे भविष्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे, अशा स्थितीत तहसील कार्यालय समोर पेंडाल टाकून साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व कामगारांच्या मागण्या लक्षात घेता लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांचे प्रयत्न सुरू आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले त्यावेळी उपोषणकरते कामगार ज्ञानेश्वर हेडाऊ,नाना पिसे,रंजीत सिंग ठाकूर, महेश वकील,प्रवीण चौधरी, पंजाबराव लेवडे, प्रवीण झाडे, द्वारकादास जोशी,धर्मराज बेलखेडे, रवींद्र गोडसेलवार, प्रशांत डोके,विनोद ठाकरे,श्रीराम पिसे,संजय गंधेवार, रामेश्वर लाकडे, गजानन डोंगरे,प्रभाकर शेंडे,रामनारायण पांडे,शेखनसीर शेखदादामिया, महेश दुबे,दिलीप चौधरी,प्रकाश बुटले,राजकुमार खोब्रागडे,अजय देवढे, टीकमचंद चव्हाण, राजेंद्र कुसुरकर, राजू वैरागडे,शब्बीर मिर्झा, मोहन पोकले,प्रल्हाद मेसरे,ज्ञानेश्वर अंद्रस्कर,दीपक पर्धे, गणेश निमजे, संजय सायंकार,राजू नरड, दशरथ वैरागडे,देवराव साबळे,शंकर राडे,रमेश खरडे, विनोद दांडेकर, लीलाधर शिवणकर,विनोद ढगे, बबन बेलखेडे,देविदास लोणकर, मोरेश्वर लोणकर,श्रीराम सातघरे इत्यादी कामगार उपस्थित होते.