अखेर त्या आस्वलाच्या दोन पिलांच्या बेपत्ता झाल्याचे कारण आले समोर

52

अखेर त्या आस्वलाच्या दोन पिलांच्या बेपत्ता झाल्याचे कारण आले समोर

अखेर त्या आस्वलाच्या दोन पिलांच्या बेपत्ता झाल्याचे कारण आले समोर

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोन अंतर्गत येणार्‍या पळसगाव वनपरिक्षेत्रामधील विहीरगाव परिसरातील वाघेडा रस्त्यावरील चौधरी यांच्या शेतात 19 जानेवारीपासून अस्वल व तिचे दोन पिल्ले वावरत असताना समाजमाध्यमांवर त्यांची चित्रफित प्रसारित केली गेली होती.त्यानंतर वनविभागाने तब्बल चार दिवसानंतर अस्वलाला बचाव पथकाकडून जेरबंद केले. मात्र, तेव्हापासून पिल्ले गायब होते. दरम्यान, शुक्रवारी मात्र या पिल्लांची वन्यप्राण्यांनीच शिकार केल्याचे मान्य करून, तसे पुरावे वरिष्ठ वनाधिकार्‍यांकडे सादर केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ठेमस्कर यांनी दिली.

अस्वलाला बचाव पथकाद्वारे मदनापूर येथील राखीव जंगलात नेण्यात आले होते. मात्र, निरागस कोवळ्या पिल्लांच्या जीवांना अन्य वन्यप्राण्यांनी मारल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडून वर्तविला जात होता. त्या दोन पिल्लांची शिकार झाली, की पिल्ले बेपत्ता झाले, याचा शोध लागत नसल्यामुळे त्या पिल्लांच्या मृत्यूचे गूढ कायम होते. वनविभागाने इतर वन्यप्राण्यांनी अस्वलाच्या पिल्लांना फस्त केल्याचा अंदाज वर्तविला होता. पंचनामा केला असता, त्यांचा अंदाज खरा ठरला असून, अखेर शुक्रवारी वनविभागाच्या वतीने पुरावा सादर केला गेला आहे. याबाबतचे पुरावेसुद्धा जारी केले असल्याचे ठेमस्कर यांचे म्हणणे आहे.