धडक सिंचन योजनेचे थकीत असलेले २ कोटी प्राप्त
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/मोहाडी : दोन वर्षापासून एक छदम पैसा लाभार्थ्यांना मिळाला नाही. वारंवार अनुदान मिळण्यासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले. भंडारा जिल्हयासाठी २ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना विहिरी मंजूरीच्या दोन किंवा अधिक वर्ष चालणाऱ्या प्रक्रियेला तडा देवून ऑनलाईन अर्ज प्राप्त करणे व प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाला धरून मंजूरी देण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील
सरासरी पर्जन्यमान दरवर्षी समाधानकारक राहते. परंतू अनियमित व खंडित पावसामुळे आणि सि’चनाच्या योग्य सोई-सुविधा उपलब्ध नसल्याने शेतातील पिकांवर विपरीत परिणाम होवून शेतमालाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. या वर्षीही धान उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. यावर उपाय म्हणून सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम दिनांक ११ सप्टेंबर २०१६ पासून हाती घेतला आहे. मागील दोन वर्ष कोरोणा काळात गेले. त्याचा परिणाम धडक सिंचनाच्या अनुदानावर झाला. अडीच कोटी रुपयाची गरज होती. त्यापैकी २ कोटी रुपये भंडारा जिल्ल्याच्या कोषात आणण्याचे प्रयत्न आमदार राजू कारेमोरे यांनी सफल केले आहे.
शासन कोरोना काळात रक्कम देण्यास हतबल होते. आता विविध अनुदान मिळण्याचे मार्ग सुकर झाले
आहे.