आठ फेब्रुवारी पर्यत धानखरेदीची मुदत
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/साकोली: मागील वर्षी रेकार्ड धान खरेदी झाली होती व अनेकांना आपले धान मोजण्यासाठी धान खरेदी केंद्रावर १५ ते २० दिवस वाट पाहावी लागत होती. परंतु धान खरेदीची मुदत पाच दिवसात संपणार असून सुद्धा यावर्षी अनेकांनी केंद्रावर आपले धान अजून पर्यंत आणलेले नसल्याने त्यांनी त्वरित आपले धान, खरेदी केंद्रावर आणावे असे आवाहन चुनीलाल वासनिक राजे शिवाजी महाराज शेतकरी संघटना विदर्भ यांनी केले आहे. ही मुदत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे.
या वर्षी बोनस जाहीर झाला नसल्याने शेतकऱ्यांत धान खरेदी केंद्रावर धान विकण्यास पाहिजे तसा उत्साह दिसत नसल्याने केंद्रावर धानाची आवक घटली आहे. अनेक केंद्रावर मागील वर्षीच्या तुलनेत धानाची फार कमी आवक झाली आहे. धान खरेदीची मुदत येत्या आठ दिवसात म्हणजे ३१ फेफळवारी रोजी संपत आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपले धान खरेदी केंद्रात आणले नसतील त्यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर धान घेऊन जावे असे आवाहन चुनीलाल वासनिक राजे शिवाजी महाराज शेतकरी संघटना विदर्भ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.