नागभीड तालुक्यातील मौजा-कोथुळना येथील सेवा सहकारी संस्थेवर भाजपाचे वर्चस्व..
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड -तालुक्यात काही दिवसांपूर्वी मौजा- कोथुळना येथे सेवा सहकारी संस्थेच्या सदस्य निवडीची निवडणूक पार पडलेली होती.
त्यामुळे सहकारी संस्थेच्या नवं नियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष ह्या पदाकरिता 25/01/2022 रोज मंगळवारला प्रक्रिया पूर्ण करण्यात आली त्यामध्ये सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.संतोषजी पिसे तर उपाध्यक्ष पदावर राजेश्वरजी रडके हे निडून आले तर सदस्य म्हणून हरिभाऊ शिवणकर, बंडूभाऊ शेंडे,रागिनीताई गुरपुडे, वसंतरावजी पानसे,नामदेवजी बावणे हे निवडून आले.
सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचे सदस्य निवडून यावे ह्या करिता मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,निवडणूक जिंकण्याचे श्रेय मा,दिंगाबरजी गुरपुडे अध्यक्ष खरेदी विक्री संस्था नागभिड ,शशीभाऊ राहाटे संचालक खरेदी विक्री संस्था, गणेश जी तवैकर उपाध्यक्ष नगरपरिषद,अवेशजी पठाण सभापती कृ.उ.बा.स.नागभीड,सचिन आकुलवार बांधकाम सभापती न.प.नागभीड,सुनिल शिवणकर भाजपा तालुका महामंत्री नागभीड,विनोद हूकरे,दौलत शिवणकर,विनोद थोटे,ज्ञानेश्वर भेंडारकर,राजुजी पिसे,मंजुषाताई डहारे,रामाजी डाहारे ,मधुकर डाहारे तसेच अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या मदत करणारे हितचिंतक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याच प्रयत्नातून भाजपाचे विजय झाले.