माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती भंडारा जिल्हा अंतर्गत लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे पिकांवर अत्याधुनिक यंत्रांच्या (ड्रोन) सहाय्याने फवारणी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण घेण्यात आले. या माध्यमातून फळबाग, भाजीपाला, धान पिकावर औषध फवारणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी :-पालांदूर-जेवनाळा परिसरात फळबाग व भाजीपाला लागवड शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. कृषी क्षेत्रात पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक बाब आहे. पीक संरक्षणासाठी कृषी रसायनाचा वापर ही खर्चिक बाब आहे. योग्य वेळी फवारणी करणे, कृषी रसायनांच्या सुरक्षित व शिफारशीनुसार वापर करणे, फवारणीसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे या बाबींना महत्त्व आहे. शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करण्यासाठी गरजेवेळी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता होत नाही. श्रम कमी करणे यासोबतच सुरक्षित फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयोगी आहे. त्यात फवारणी सुलभ व्हावी व शेतकऱ्यांना अद्यावत यंत्रसामुग्रीची माहिती मिळावी या उद्देशाने बुधवारी प्रगतशील शेतकरी तथा माजी जि.प. सभापती विनायक बुरडे यांच्या गुरढा जवळील शेतावर शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले.
या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माऊली ग्रीन आर्मी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, नवनिर्वाचित जि.प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर, माजी जि.प. सभापती विनायक बुरडे, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, उमेद जिल्हा व्यवस्थापक गौरव तूरकर, तहसीलदार महेश शितोडे, सरपंच वैशाली बुरडे जेवनाळा, सरपंच कल्पना सेलोकर खुनारी, जितेंद्र चौधरी, संदीप हिंगे, नरेंद्र बुरडे, सविता तिडके, नगरसेवक बबलू निंबेकर, माजी जि.प, सदस्य दामाजी खंडाईत, किराणा व्यापारी इद्रीस लध्दानी, माजी जि. प. सदस्य निलकंठ कायते, प्रभाकर सपाटे, शैलेश गजभिये, मुन्ना उपरीकर, दीपक पाटील, प्रमिला झेलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक मनीषा नागलवाडे यांनी केले. स्प्रे ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यासाठी व प्रत्यक्ष बघण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
ड्रोनने फवारणी, सुलभ फवारणी
शेतकऱ्यांना योग्य वेळी शेतमजूर न मिळाल्याने अनेकदा नुकसानीचा सामना करावा लागतो. मात्र, आता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून यावर मात करता येईल. या प्रशिक्षणामध्ये अडीच एकरला वीस मिनिटात फवारणी करण्यात आली. यामध्ये आंबा, लिंबू फळबाग, भाजीपाल्याचे वांगे, टमाटर, मिरची, वाल पिकांवर तर उन्हाळी धान पिकावरही फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
*पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन पिकांचे आरोग्य मूल्यांकन इत्यादी कामांमध्ये ड्रोनचा वापर महत्त्वाचा ठरतो. पीक व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.*
*शेतीचे कामे करताना मजुरांची टंचाई ही नेहमीची समस्या आहे. मात्र, आम्ही आज घेतलेल्या प्रशिक्षणामधून ही समस्या दूर होईल. शासनाने स्प्रे ड्रोन यंत्रणा खरेदीला अर्थसहाय्य अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना ते खरेदी करणे सोपे होईल.वसंत भुते, शेतकरी जेवनाळा*
*शेतकामासाठी वेळेवर उपलब्ध न होणारे मजूर, त्यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तसेच उंच वाढणाऱ्या पिकांवर ड्रोन द्वारे फवाराणी पध्दत नक्कीच किफायतशीर व लोकप्रिय ठरेल.विनायक बुरडे, प्रगतशिल शेतकरी तथा माजी जि.प. सभापती*