ऑनलाइन खरेदीच्या नावावर साडेतीन लाखांचा फसवणूक, दोघांना अटक

57

ऑनलाइन खरेदीच्या नावावर साडेतीन लाखांचा फसवणूक, दोघांना अटक

वर्धा :- ध्या ऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढत असून याच प्रकारातून सेलू येथील एका व्यापाऱ्याला तीन लाख 40 हजार रुपयांचा गंडा बसला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सेलू पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली.

 सेलू येथील व्यापारी अनुज दिलीप भटेरो यांनी इंडिया मार्ट मार्केटिंग या साईटवर अ‌ॅग्रिकल्चर स्प्रे-पंप पाहिजे असल्याची जाहिरात टाकली. यातून तक्रारदाराच्या मोबाईलवर एक बुकलेट प्राप्त झाले. यावरून 250 नग स्प्रे-पंप बाबत करार झाला. यासाठी 3 लाख 40 हजार रुपयांचा एक धनादेश सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून आर.टी.जी.एस.ने शिवम एक्‍सस्पोर्ट कंपनीच्या खात्यावर पाठविण्यात आले. परंतु, सदर ऑर्डरची वाट पाहिली असता ऑर्डर प्राप्त न झाल्याने तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरविली असता यशराज सुभाष सखीया हा एचडीएचसी बँक शाखा राजकोटचे खाते  चालवत असून सदरचे खाते हे शिवम एक्‍सपोर्टच्या नावाने असल्याचे पुढे आले. तसेच एक विधी संघर्षित बालक हा अजय पटेल या नावाने मोबाईल फोनद्वारे तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांच्याशी वाटाघाटी करून कृषी स्प्रे-पंप व इतर वस्तूचे बदल्यात व्यवहार करीत असल्याचे पुढे आले. या दोघांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील विठ्ठल गाडे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, राकेश देवगडे, अमोल राऊत, विक्रम काळमेघ व महिला पोलिस कुंदा तुरक यांनी केली.