साई सरकार ग्रुप बल्लारपूर चे अध्यक्ष मोहित डंगोरे यांच्या वाढदिसानिमित्त रक्तदान व श्रम कार्ड शिबिर
सौ. हानिशा दुधे
तालुका प्रतनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :-भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा साई सरकार ग्रुप, बल्लारपूरचे अध्यक्ष मोहीत डंगोरे
यांच्या वाढदिवसानिमित आयोजित शिबिरात ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासोबतच श्रमिक कार्ड शिबीराचे देखील येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ.
राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारपूर माता मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात ४४ रक्तदात्यांना रक्तदान केले तसेच २५० कामगारांना श्रमिक कार्ड बनवून देण्यात आले.
यासाठी, धनसिंग पटेल, वसंता गजपुरे , अरमान शेख , गोलू गोरडवार , गौरव गजपुरे , राहुल बेंबंसी , करण अल्हाट , आकाश शर्मा , शिवम वाघमारे , कुणाल अन्सुरी , प्रणय कुंभीलवार , चिंटू डंगोरे , इर्शाद शेख , शुभम पोगडे , गोपाल पासवान , रोहित बेंबांसी, रोहित चौबे , शब्बीर शेख , आनंद डोंगरे , कुणाल सहारे , प्रथम शेंडे , संकेत पाटील , अमन तलापल्लिवर , सुमित कनोजवार आदींनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाला, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,यांसह आदि मंडळी उपस्थित होते.