रेतीचा अवैध ट्रॅक्टर पकडला
पालांदूर पोलीसाची कारवाई
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखनी :-तालुक्यातील पालांदुर पोलीस स्टेशन हद्दीतील लाखांदूर तालुक्यातील तई /बु. येथील रेती घाटातून अवैधपणे उत्खनन व वाहतूक करताना एक ब्रास रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला. ही कारवाई पालांदूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी केली. महेश भाऊराव भेंडारकर(२७) रा.तई/बु. याच्यावर भांदवी ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तालुक्यातून वाहणारी चुलबंद नदी घाटाचे अद्यापही महसूल विभागाकडून लिलाव करण्यात आले नाही त्यामुळे रेतीची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे . अवैध रेती उपसा करताना आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. एमएच ३६ ए.जी.६०३८ युओडीआय कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एमएच ३६ झेड ७९४६ ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. तपास ओमप्रकाश केवट, नावेद पठाण करीत आहेत.