अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित शाळेत प्रवेश

53

अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित शाळेत प्रवेश

अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामांकित शाळेत प्रवेश

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:-सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत इयत्ता पहिल्या व दुसऱ्या वर्गात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याकरिता अनुसूचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा तसेच सक्षम अधिकारी (उपविभागीय अधिकारी महसूल) यांचेकडून प्राप्त दाखला जोडवा. सन 2021-22 या वर्षात पालकाचे सरासरी एकत्रित उत्पन्न एक लाख रुपयाचे आत असावे. इयत्ता 1 ली करिता विद्यार्थ्यांचे जन्म दाखला व इयत्ता दुसरी करिता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरिता 7 शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र संपर्क साधावा.
फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज 7 मार्च 2022 पर्यंत स्विकारले जाणार आहे.