
मीडियावार्ता न्युज
७ फेब्रुवारी, मुंबई: वॉर्ड क्रमांक ११९ (जुना वॉर्ड क्रमांक) ( नवीन नोंदणी वॉर्ड क्रमांक १२२ ) येथील गणेश मार्ग, हरियाली व्हीलेज, विक्रोळी पूर्व, मुंबई – ४०००८३. येथे मागील १० ते १५ दिवसापासून सर्वजनिक शौचलाईन भूमिगत पद्धतीने टाकण्याचे काम सुरु केलेले आहे. परंतु काम अतिशय ढिसाळ पद्धतीने करण्यात येत आहे. काम करणारे ठेकेदार कोण आहे हे माहित नाही. काम जेथे केले जात आहे. तेथे कोणताही फलक / बोर्ड ठेकेदाराकडून लावण्यात आलेला नाही. कामगारांच्या सुरक्षेचा अभाव दिसून येतो.
खड्डा खोदल्यानंतर निघणारा मातीचा ढीग रस्त्यावर पांगला आहे. त्याची व्यस्थित विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याशेजारील रहिवाश्याच्या दारात व्यवसायिकांच्या दुकानारासमोर ढिगारे ठेवण्यात आलेले आहेत. येथे कोणताही महानगर पालिका एस विभागाकडून येऊन कामाची दररोज पाहणी करीत नाही. अतिशय हलगर्जीपण सुरु आहे.
भूमिगत जे नाले पाईप टाकण्यात आलेले आहेत ते अतिशय हलक्या दर्जाचे ५ ते ६ महिन्यात जमिनीत कुजून जातील अशा स्वरूपाचे मातीचे पाईप येथे वापरण्यात आलेले आहेत. यामुळे भविष्यात पाईप गळती होऊन विभागात घाणीचे साम्राज्य पसरेल यात तिळमात्र शंका नाही.

ज्यांना काम दिले आहे त्यांना या कामाची काहीही माहिती नाही असे देखील समजते तसेच त्यांचेकडे या कामाचा काम करण्याचं शिक्षण देखील घेतलेले नाही. वर्क ऑर्डर मागणी केली असता ती देखील दाखविली जात नाही. हे काम कधी संपेल हे देखील समजत नाही. तरी अशा बेजवाबदार ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करून उचित ठेकेदार नेमून रहिवाश्याना होत असलेल्या त्रासातून मुक्ती द्यावी. आणि या कामाकडे दुर्लक्ष करीत असलेली नगरसेविका मनीषा राहते याना देखील समाज देणेत यावी, असे परिसरातील नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे.