भंडारा नगरपरिषदेवर आजपासून प्रशासक

54

भंडारा नगरपरिषदेवर आजपासून प्रशासक

भंडारा नगरपरिषदेवर आजपासून प्रशासक

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:-कोरोना संसर्गामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने मुदत संपलेल्या भंडारा नगरपरिषदेवर आज, सोमवार ७ फेब्रुवारीपासून प्रशासक येणार आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव पदभार स्वीकारणार आहेत.
भंडारा नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ ६ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी मावळत्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला होता. परंतु, आता कोरोनामुळे निवडणूक तूर्तास घेणे शक्य नाही. त्यामुळे नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात येत आहे. ३३ सदस्यीय नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. प्रशासकालासर्वसाधारण सभा, स्थायी समिती यासह सर्व अधिकार प्राप्त होणार आहेत.भंडारा नगरपरिषदेने गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामे खेचून आणली. खासदार सुनील मेंढे नगराध्यक्ष असल्याने त्यांनी आपल्या कार्यकाळात भंडाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला.