PROPOSE DAY: ‘प्रपोज डे’ स्पेशल व्यक्ती समोर व्यक्त करा मनातील भावना!

60

PROPOSE DAY:प्रपोज डे’ स्पेशल व्यक्ती समोर व्यक्त करा मनातील भावना!

PROPOSE DAY: ‘प्रपोज डे’ स्पेशल व्यक्ती समोर व्यक्त करा मनातील भावना!
PROPOSE DAY: ‘प्रपोज डे’ स्पेशल व्यक्ती समोर व्यक्त करा मनातील भावना!

प्रशांत जगताप✒
मिडिया वार्ता न्युज कार्यकारी संपादक
📱976644534
PROPOSE DAY:- प्रेमीयुगला साठी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा खुप स्पेशल असते. कारण या आठवडा व्हॅलेंटाईन विक म्हणून जगभर उत्साहात साजरा करण्याची परंपरा आज प्रत्येकात दिसून येत असते. प्रेमी प्रेमीका तर या व्हॅलेंटाईन डे विकची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि असे क्षण नेहमी जीवनात येत रहो अशी आशा व्यक्त करत असतात. !

प्रेमीयुगलाचा स्पेशल व्हॅलेंटाईन वीकला 7 फेब्रुवारी पासून तरुणाच्या नव उत्साहाला सुरुवात झाली आहे. आज “प्रपोज डे” या दिवशी लोक आपल्या स्पेशल व्यक्ती, मैत्रिण, जोडीदार यांना प्रपोज करुन आपल्या मनातील भावना प्रेमातुन व्यक्त करतात. तरुणाईचा प्रसिद्ध व्हॅलेंटाईन वीक हा दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. “प्रपोज डे” दरवर्षी 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो.

आपल्या आयुष्यात एक स्पेशल अस कुणी तरी असाव अशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. आपण ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात विशेष स्थान देतो, तो किव्हा ती आपल्या आपल्याला मनापासून आवडते तर आज आपल्या मनातील भावना त्या व्यक्ती जवळ व्यक्त करत प्रपोज करा. आणि आपल्या प्रेमाचा नात्याची सुरुवात करण्याचा आजचा खास दिवस.

PROPOSE DAY: ‘प्रपोज डे’ स्पेशल व्यक्ती समोर व्यक्त करा मनातील भावना!

व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची, क्षणाची किंवा कोणत्याही मुहूर्ताची खरं तर आवश्यकता नसते. आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘प्रयत्न’ ‘प्रेम’ आणि ‘वेळ’. या तीन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाही. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचे प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला देखील स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचे आहे का? तर तिला/ त्याला एखादा छानसा मेसेज देखील पाठवुन आपल्या मनातील भावना प्रकट करु शकता.

जीवनाला सुवर्ण क्षणाने सजवायच असेल तर ती किव्हा त्यांचे अंतरमनातील भावना जानण्याची किमया तुम्हच्यात असली पाहिजे तरच ते नाते परिसासारखे पवित्र झाल्या वीणा राहत नाही. त्यामूळे प्रोपज करताना आपल्या बरोबर दुस-याच्या विचाराला पण स्वतंत्र्य दिल जायल हव. तरच ते नाते अटुत राहते.