भारतरत्न,गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

55

भारतरत्न,गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

भारतरत्न,गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-तालुक्यातील पालांदुर येथील गोविंद विद्यालयात भारतरत्न,गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य गोवर्धन शेंडे व संगीत शिक्षक भास्कर पिंपळे यांनी लतादीदीच्या जीवनावर प्रकाश टाकला .राष्ट्रीय शिक्षण संस्था आणि लता मंगेशकर यांच्या कुटुंबाचा सलोखा होता,त्यांचे लहान बंधू पंडित हदयनाथ मंगेशकर यांनी संस्थेला भेट दिली होती.आपल्या जादुई आवाजाने लताताई नि संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली होती.असे उदगार गोवर्धन शेंडे सरांनी काढले. लतादिदींच्या जाण्यामुळे सप्तसुर अबोल झाले असे भावनिक उदगार भास्कर पिंपळे यांनी काढले. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक आदित्य लाखनिकर,अविनाश राऊत,विनोद वंजारी,श्यामराव भुसारी ,देवेंद्र शेंडे,व इतर शिक्षक उपस्थित होते.