चारित्र्यावर संशयघेऊन पत्नीला मारले, पोलिसांत जात असताना भररस्त्यात पतीचा चाकूने हल्ला, डोंबिवलीत खळबळ.

55

चारित्र्यावर संशयघेऊन पत्नीला मारले, पोलिसांत जात असताना भररस्त्यात पतीचा चाकूने हल्ला, डोंबिवलीत खळबळ.

चारित्र्यावर संशयघेऊन पत्नीला मारले, पोलिसांत जात असताना भररस्त्यात पतीचा चाकूने हल्ला, डोंबिवलीत खळबळ.

✒मुंबई महानगर प्रतिनिधी✒

मुंबई:- मुंबईच्या डोंबिवली येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पत्नीचा चारित्र्यावर संशय घेणा-या पतीने पत्नीवर धारधार चाकू हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात राहणा-या एका महिलेने आपला पती चरित्रावर संशय घेत असल्यामुळे आणी त्यात मोठ्या प्रमाणात मारहान व त्रास देत असल्याने पिढीत महिला आपल्या पती विरोधात तक्रार करण्यासाठी पत्नी पोलीस स्टेशनला निघाली होती. यावेळी पतीने पत्नीवर भररस्त्यात धारधार चाकूने हल्ला केला. भररस्त्याच्यात हे सर्व झाल्याने परिसरात खळखळ उडाली होती. पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जखमी पत्‍नीला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पती सोमनाथ देवकर हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

●काय आहे प्रकरण? ●

चारित्र्य आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. वाद हा विकोपाला गेला या वादातून पतीने आपल्या पत्नीला बेहरमपणे मारहाण केली. याबाबतची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलीस ठाण्यात जात असता पतीने भररस्त्यात धारधार चाकूने वार करुन गंभीर जखमी केल आहे.

पत्नी जखमी, पती फरार

जखमी पत्‍नीला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ देवकर असे या पतीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भररस्त्यात पतीने पत्नीवर वार करून गंभीर जखमी केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.