सावली (वाघ) येथील पांदन रस्त्यांच्या विकास कामांना वेग.

59

सावली (वाघ) येथील पांदन रस्त्यांच्या विकास कामांना वेग.

सावली (वाघ) येथील पांदन रस्त्यांच्या विकास कामांना वेग.

करण विटाळे
हिंगणघाट ग्रामीण तालुका
प्रतिनिधी – 8806839078

हिंगणघाट :- सोमवार रोजी सावली (वाघ) ते उमरी येडे या रस्त्याचे काम हे अनेक वर्षांपासून रखडले होते. रस्ता अतिशय खडतर व दुर्गम होता आणि याचच फटका शेतकऱ्यांना बसत होता त्या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दूसरा मार्ग नसल्याने एक मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला होता. परंतु अनेकांच्या प्रयत्नाने अखेर या रस्त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले . व काल सोमवार रोजी मा. श्री, नितीनजी मडावी माजी. जि. प. अध्यक्ष यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले आहे यावेळी हिंगणघाट तालुका महामंत्री, विनोदजी विटाळे, विठ्ठलराव कुटे,धिरज कुटे संदीप कुकडे, अरविंद कुकडे, निलेश मानकर, प्रकाश कुकडे, किसनराव बैलमारे, संजय घुगल, संजय ऐकोनकर, रमेश घुगल आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.