चेकबापुर-सकमुर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश
हस्तक वाळके
मूल तालुका प्रतिनिधि
गोंडपिपरी तालुक्यातील चेकबापूर -सममुर येथील काँग्रेस कार्यकर्ते साहिराज अलोने यांनी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केल्याची माहिती मंगळवारला दिली आहे. तालुक्यात
मागील 20 ते 22 वर्षांपासून राजकीय कार्यास सुरुवात केली आणि 1998 पासून भारतीय रास्ट्रीय कांग्रेस मध्ये काम करीत होते.
अनुसुचीत जाती सेल चे तालुका सचिव पदाची जबाबदारी दिली होती.
अश्यातच प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच संपुर्ण महारास्ट्र आणि देशातील वाढत्या झंझावात पाहुन त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला.
आंबेडकरीय कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत आपल्या काही निस्टावंत कार्यकर्ता समवेत वंचित बहुजन आघाडी तालुका गोंडपिपरी चे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडी चे कार्यकता समक्ष वंचित बहुजन आघाडी मधे पक्ष प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका गोंडपिपरी चे अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर हे त्याना पक्षाची टोपी आणि पक्षाचा झेंडा हातात देऊन पक्ष प्रवेश करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी कडुन त्याचे मन्पुर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी
डाॅ प्रकाश तोहगावकर,
नामदेव शेरके, जीवन अलोने , पुंडलिक झाडे, भीमराव कोरडे, दिलीप मुंजनकर, प्रकाश कातकर ,जीवन गोंगले, संतोष मुगलवार ,इद्रपाल दहागावकर, रोशन अलोने, विनोद अलोने,यांची उपस्थित होते