खासदार सुनील बा. मेंढे शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे काम सुरु होणार केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे आश्वासन – खा.सुनील मेंढे

56

खासदार सुनील बा. मेंढे

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे काम सुरु होणार

केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे आश्वासन – खा.सुनील मेंढे

खासदार सुनील बा. मेंढे शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे काम सुरु होणार केंद्रीय आरोग्य मंत्र्याचे आश्वासन – खा.सुनील मेंढे

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/गोंदिया:-गोंदिया येथील कुडवा वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मा.डॉ.मनसुख मांडविया यांची काल दि.८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे मंत्रालयात भेट घेतली. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे.इंजिनीयरींग प्रोजेक्टस (इं) लिमिटेड, ह्या कंपनीची रुग्णालय व महाविद्यालयासाठी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी लवकरात लवकर रुग्णालयाचे काम सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ.मनसुखभाई मांडविया यांनी मंत्रालयाच्या अधिका-यांना दिले.
६८९ कोटी रूपये खर्चाचे हे रुग्णालय गोंदिया जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यासाठी सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाची गरज व आवश्यकता खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे मांडली. करीत असलेल्या सहकार्याबद्दल खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व आरोग्य राज्यमंत्री मा.भारतीताई पवार यांचे आभार मानले..