शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व कामगार सेना चे जिल्हा अध्यक्ष कबिर धर्माजी निकुरे यांनी दिली धडक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात. रोडवर वाहने उभी करण्यावर कारवाही करण्याबाबत 

60

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व कामगार सेना चे जिल्हा अध्यक्ष कबिर धर्माजी निकुरे यांनी दिली धडक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात.

रोडवर वाहने उभी करण्यावर कारवाही करण्याबाबत 

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना व कामगार सेना चे जिल्हा अध्यक्ष कबिर धर्माजी निकुरे यांनी दिली धडक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात. रोडवर वाहने उभी करण्यावर कारवाही करण्याबाबत 

विनोद कोडापे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
8380802959

गडचिरोली, शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतुक सेना व कामगार सेना चे विदर्भ संपर्क प्रमुख सय्यद रब्बानी चिष्ती च्या आदेशानुसार निवेदनात आपल्याला निदर्शनास आणुन देण्यात येते की , आपला गडचिरोली जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो . आणि त्याला मागास ठेवण्याकरीता शासन – प्रशासन खत पाणी घालतो असे होवू नये म्हणून शिवसेना प्रणीत वाहतुक सेना जिल्हा गडचिरोली आपल्याला वाहतुकीच्या सुरक्षतेच्या बाबतीत खालील बाबी निदर्शनास आणुन देत आहे . खाजगी प्रवासी वाहने भर रस्त्यावर उभी करून तासंतास प्रवासी भरतात . नियमाच्या पलीकडे गाडीत प्रवासी भरतात . रस्त्यावर व्हॅलीड नसणाऱ्या गाड्या चालतात . तसेच भंगार , गोंगाट करणाऱ्या धुवा सोडणाऱ्या गाड्या चालतात . नियमीत रस्त्याच्या कडेला उभ्या असणान्या गाड्यांवर कारवाही करण्यात यावी . स्कुल बसेसला सेफ्टी गार्ड लावलेले नाहीत . शहरातुन खाजगी वाहनांनी विद्यार्थी सोडतात त्यांनी पण सेफ्टी गार्डची ( जाळी ) व्यवस्था केलेली दिसत नाही . आटो रिक्षा चालक वर्दीत नसल्याने प्रवाशांची फसगत होते , वर्दीत असणे बंधनकारक करावे . तीन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे व वाहतुकचे नियमांचा पालन केल्या जात नाही . वरील सर्व मुद्दे वाहतुकीस त्रासदायक आहेत . परंतु आपण व आपली वाहतुक पोलीस याकडे लक्ष न देता एखाद्या म्हाताऱ्याला ट्रिपल शिट बसवून नेतांना पकडतात व फाईन वसुलीकडे लक्ष देतात यामुळे जनतेच्या मनात आपल्याबद्दल व शासनाबद्दल वाईट भावना तयार होत आहेत व वाहतुक सुरक्षा विस्कळीत होत आहे . तरी हा प्रकार लवकरात लवकर बंद करण्यात यावा अन्यथा शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतुक सेना व कामगार सेना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष कबीर धर्माजी निकुरे व माझे पदाधिकारी तसेच शिवसैनिक वाहतुक सुरक्षा करण्यासाठी स्वतःच लक्ष देईल.
निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष चांगदास मसराम, जिल्हा संघटक देवराव दुधबडे, जिल्हा सचिव नोमाजी लाडे,
शहर विभाग प्रमुख रमेश बांबोळे, नागसेन खोब्रागडे, रवी कंकलवार,आनंदसातपुते,उमेश भांडेकर,छत्रपती बुरांडे, नरेश पवार असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.