PROMISE DAY: "प्रॉमिस डे" सुखा दुखात साथ देण्याच वचन, धरा आंनदी जिवनाची कास.
PROMISE DAY: "प्रॉमिस डे" सुखा दुखात साथ देण्याच वचन, धरा आंनदी जिवनाची कास.

PROMISE DAY: “प्रॉमिस डे” सुखा दुखात साथ देण्याच वचन देऊन धरा आंनदी जिवनाची कास.

● द्या वचन आयुष्यभर साथ निभावण्याचे
● द्या वचन विश्वासाशी दगा न करण्याचे
● द्या वचन भावना अन् सन्मान जपण्याचे
● द्या वचन संकटात सुरक्षा पुरविण्याचे
● द्या वचन देहावर नव्हे मनावर प्रेम करण्याचे.

PROMISE DAY: "प्रॉमिस डे" सुखा दुखात साथ देण्याच वचन, धरा आंनदी जिवनाची कास.
PROMISE DAY: “प्रॉमिस डे” सुखा दुखात साथ देण्याच वचन,

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक✒
📱7385445348
प्रॉमिस डे:- या जगात प्रेमाने काहीही जिंकता येत अस बोलले जाते. आणि प्रेम हे आंधळ पण असते कारण प्रेम हे कधी कुणावर होईल यांची कुणी श्वास्वती देऊ शकत नाही. प्रेम जात, धर्म, वय, गरीब, श्रीमंत गोरा काळा यांचा भेद करत नाही. फक्त मुक्त पणाने प्रेम करत राहावे असेच आपल्या मनाला सांगत असते.

प्रेमीयुगलासाठी फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा खुप स्पेशल असते. कारण या आठवडा व्हॅलेंटाईन सप्ताहा म्हणून जगभरात उत्साहात साजरा करण्याची परंपरा आज प्रत्येकात दिसून येत असते. प्रेमी प्रेमीका तर या व्हॅलेंटाईन डे विकची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि असे क्षण नेहमी जीवनात येत रहो अशी आशा व्यक्त करत असतात.

प्रेमीयुगलाचा स्पेशल व्हॅलेंटाईन वीकला 7 फेब्रुवारी पासून तरुणाच्या नव उत्साहाला सुरुवात झाली आहे. आज “प्रॉमिस डे” या दिवशी लोक आपल्या स्पेशल व्यक्ती, मैत्रिण, जोडीदार यांना ‘वचन” देऊन आयुष्यात तूझा सुखा – दुखात अशीच साथ देईल अस वचन देतात. त्या एका वचनामुळे जन्म जन्मातरचे एक घट्ट नाते जोडले जाते. ते कधी ना तुटण्यासाठी.

पती – पत्नी, प्रेमीयुगल, मित्र – मैत्रिणी या दिवशी कायम ऐकमेकांची साथ निभावण्याचं वचन एकमेकांना देतात. सुखदु:खामध्ये ते कायम एकत्र राहणार असल्याचं एकमेकांना या दिवशी सांगतात. दरम्यान रिलेशनशीप मध्ये येणार्‍या चढउतारांमध्ये अनेकदा समोरच्या व्यक्तीला गृहित धरलं जातं. पण प्रॉमिस डे च्या निमित्ताने एकमेकांना आपण एकत्र राहू या वचनाची आठवण करून दिली जाते. मग धावपळीच्या झालेल्या या जगात प्रॉमिस डे पेक्षा एकदा एकमेकांना आठवण करून देण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असेल. मग यंदा प्रॉमिस डे च्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला प्रेमाच्या कबुली सोबत कायम साथ निभावण्याचं वचन देखील नक्की द्या.

आज नाते फक्त वेळ, पैसा, रुप, चमकधमक पाहुण करण्याची परंपरा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पण प्रत्येक नात्याचा गाभा हा विश्वास असतो. मग नात दृढ करण्यासाठी हा विश्वासच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग आनंद असो की दु:ख तुमचं नातं कमजोर पडू नये म्हणून विश्वासावर देखील काम करायला शिका.

PROMISE DAY: "प्रॉमिस डे" सुखा दुखात साथ देण्याच वचन, धरा आंनदी जिवनाची कास.

केवळ शब्दांमधून व्यक्त झालेल्या वचनांच्या भुलभुलय्यात न भुलता खऱ्या प्रेमाचा शोध घेण्याचा विचार युवक – युवतींनी करावा. वचन देणे खूप सोपे आहे; कारण ते देताना केवळ शब्दांचे भांडवलच हवे असते. परंतु खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा ते वचन पाळायची वेळ येते. या कसोटीत खरे उतरण्यासाठी त्याला कृतीची जोड देणे आवश्यक आहे.

व्यक्तीसोबत अतुट नाते जोडण्यासाठी आपल्या परीने नात्यात गोडवा निर्माण करावा लागतो, आपली आवडती व्यक्ती जीवनात येण्यासाठी गरजेच्या गोष्टी असतात त्या म्हणजे ‘सुमधूर बोली’, ‘समजदारी’ आणि ‘दुखात साथ’. या तीन्ही गोष्टींमुळे कोणतीही व्यक्ती अगदी आपसुकच आयुष्याच्या प्रवासात आपल्यासोबत जोडली जाते. अशा व्यक्तीसमोर मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज नाही. या दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःच वचन देऊन तिला किव्हा त्याला आपण कायमच आयुष्यभर खुश ठेऊ शेकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here