श्री सद्गुरू आडकूजी महाराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोपाळराव हटवार तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण कडू.

55

श्री सद्गुरू आडकूजी महाराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोपाळराव हटवार तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण कडू.

श्री सद्गुरू आडकूजी महाराज पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोपाळराव हटवार तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण कडू.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड -येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री.सद्गुरू आडकूजी महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या आज शुक्रवार दिनांक 11/2/2022 रोजी झालेल्या पहिल्या मासिक सभेत सर्व सदस्याच्या अनुमतीने पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोपाळराव हटवार तर उपाध्यक्ष पदी लक्ष्मण कडू यांची एकमताने निवड झाली.
यापूर्वी पतसंस्थेची निवडणूक ही दिनांक 6/2/2022 रोजी अविरोध झाली होती.. यामध्ये संचालक गोपाळराव हटवार,लक्ष्मण कडू, रमेश ठाकरे, डॉ,दिवाकर मुकुंदा चिलबुले,पितांबर चिलनकर,राजेंद्र समर्थ, केवळ राघोजी गायधने,प्रकाश वाकडे, प्रमोद जक्कनवार,सौ,कविता करंबे,सौ,नलिनी राहुड यांची अविरोध निवड झाली होती.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले. तसेच पतसंस्थेचे कर्मचारी व अभिकर्ते यांनी सुद्धा नवनियुक्त संचालक मंडळ व अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचे स्वागत केले.
निवडणूक अधिकारी म्हणून कु.कविता भोज यांनी कामकाज पाहिले.