डिजिटल लॅब ची निर्मिती
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱
लाखणी/पवनी : जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात होणारे आमुलाग्र बदल विज्ञान जगतातील लागणारे नवनवीन संशोधन अलीकडेच उदयास आलेली ऑनलाईन शिक्षण प्रणाली व त्यामुळे विद्यार्थ्यांना समोर असणारी नवनवीन आव्हाने याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करून शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करून अध्ययन – अध्यापन सुलभ करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस.टी सतदेवे यांच्या अथक प्रयत्नाने डिजिटल लॅब ची निर्मिती करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीएफ शिंदे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून डिजिटल लॅब उभारणीचे पार्श्वभूमी आणि नवनवीन विषयाचे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण सुलभ करण्यासाठी दूरचित्रवाणी चे सादरीकरण करण्यात आले होते . त्या वेळी सदर उद्घाटनाच्या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या संगीता प्रशांत बोरकर व पंचायत समिती सदस्य शेखरभाऊ पडोळे तर उद्घाटक म्हणून पंचक्रोशीतील सरपंच , उपसरपंच , पालक आणि इतर मान्यवर यामध्ये चंद्रशेखर कठाणे शाळा व्यवस्थापन स . अध्यक्ष वनमालाताई तेलमासरे वैशालीताई मेश्राम , नरेंद्रजी चुटे , प्रशांत बोरकर ( सरपंच ग्रामपंचायत आसगांव ) प्रमोद डोये उपसरपंच रनाळा , ज्ञानेश्वर पारधी माजी सरपंच भेंडाळा , स्वाती ज्ञानेश्वर पारधी सरपंच भेंडाळा , प्रेमचंद बावनकर उपसरपंच भेंडाळा , जीवन राणे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष , लालचंद नखाते शाळा व्यवस्थापन अध्यक्ष , कावरे साहेब केंद्रप्रमुख आसगाव आणि शाळेतील शिक्षक व्ही . पी . गायधनी ए .डब्लू जांभूळे जे . एल भूरे , एम . जी . बडनाग , पी . एम वैद्ये जे.पी. उईके , एन . एफ लिचडे . , एस . ए गजभिये , जी . आर . नान्हे , जी.वी. ब्राम्हणकर , पी . एन बोरकर , डी . एल . कोचे , ए . व्ही . चौधरी , ए . डी . मेश्राम , एन . के . चौव्हान , जी . एम . पवनकर , एन . एम . लोणारे पी . ई . कोचे आणि प्रा . पी . एम . गायधनी , प्रा . जी . आय . खान , प्रा . एच . एन . कुमरे प्रा . पी . ए . हटवार प्रा . डी . ए . ठाकरे , प्रा . अविनाश बेहरे प्रा . विकास बेहरे प्रा . वैद्य , आणी इतर कर्मचारी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.