शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कापणे त्वरीत बंद करा….छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजुर संघटनेचे मागणी

54

शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कापणे त्वरीत बंद करा….छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजुर संघटनेचे मागणी

शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कापणे त्वरीत बंद करा....छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजुर संघटनेचे मागणी

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी:-तालुक्यात सध्या रब्बी धान व शेतीचा हंगाम सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला विघुत विभागामार्फत शेतकऱ्याच्या शेतातिल विघुत कनेक्शन कापने सुरू आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कापणे त्वरीत बंद करा या मागणी करीता लाखणी तालुकाचे तहसिलदार व महावितरण कार्यालय लाखणी यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजुर संघटनेचे मागणी निवेदन देण्यात आले आहे.
देशाचा पोशिंदा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणा मुळे.आणि कोरोना संसर्गाच्या नियमित प्रभावामुळे पुर्णपणे हतबल झालेल्या आहे.शेतकरी पुर्णपणे शेतीचे उत्पन्न घेऊ शकत नाही. मात्र शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. विघुत विभागाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फाशी लागण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे कापले कनेक्शन त्वरीत सुरू करण्यात यावे,इतर तालुक्याप्रमाणे लाखणी तालुक्यात देखील 24तास विघुत देण्यात यावी,विघुत डिमांड भरलेल्या विघुत मिटर लावून विघुत पुवठा सुरू करण्यात यावे,बंद असलेले मिटर त्वरित दलुन देऊन मिटर रिडींग नुसार दरमहा बिल देण्यात यावे,शेतातुन ट्रांसफार्मर किवा विद्दुतप्रवाह खांब लावले असल्यास त्याचां मोबदला शासकीय नियमानुसार देण्यात यावा,शेतकऱ्यांना आवश्यक असलेले विद्दुत कनेक्शन चे डिमांड त्वरीत देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कापणे त्वरीत बंद करा अशा मागण्यांचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजुर संघटने कडून लाखणी तालुका तहसीलदार आणि महावितरण कार्यालय लाखणी येते देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले ,सचिव सुधाकर हटवार, संघटक संजय रामटेके, सुरेश बोपचे ,अशोक पटले ,नूतन ठाकरे, कृष्णा खंडाईत ,बबलू कच्छवाय,संजय बोराडे ,धनंजय बोपचे ,गिरीश बावनकुळे,प्रदीप रहांगडाले, अशोक बडवाईक,जगदिश खेडीकर,पुरन पटले आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शुर्मिला अशोक पटले यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.