गडचीरोली जिल्हातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल यादीत मोठा घोटाळा.

59

गडचीरोली जिल्हातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल यादीत मोठा घोटाळा.

● ग्रामसभेत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना केले अपात्र.
● अपात्र लाभार्थ्यांचा पत्रकार परिषदेत हेतू परस्पर नाव डावलल्याचा आरोप.

गडचीरोली जिल्हातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल यादीत मोठा घोटाळा.
गडचीरोली जिल्हातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल यादीत मोठा घोटाळा.

नंदलाल एस. कन्नाके
गडचिरोली  जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं. 7743989806

आरमोरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मोहझरी ही पेसा ग्रामपंचायत असून पंतप्रधान आवास घरकुल प्रपत्र ३ चे वाचन करण्यासाठी ग्रामसभा २६ ऑक्टोबर २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत १२ लाभार्थ्यांवर कुणीही आक्षेप न घेता पात्र करून संवर्गनिहाय प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेले असतांना काही दिवसानंतर सचिव, सरपंच व ग्रा.प.च्या काही सदस्यांनी वैमनस्यातून व हेतुपुरस्पर १२ लाभार्थ्यांचे घरकुल अपात्र ठरवून अन्याय केल्याचा आरोप मोहझरी येथे घेतलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत १२ अपात्र लाभार्थ्यांनी व्यक्त केली होती.

सदर पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार तर शहरी भागात 2 लाख 50 हजार असा शासनाकडून अनुदान देऊन, सामान्य जनतेला ज्यांची घर पडकी आहेत व आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यांना घर बांधकामासाठी आर्थिक मदत म्हणून, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. अशीच एक यादी मोहझरी ग्रामपंचायत इथून लावण्यात आली होती. सदर लाभार्थ्यांची यादी ही ग्रामपंचायत ठरावात मंजूर करण्यात आली होती. यादीमध्ये बारा लाभार्थी पात्र ठरवण्यात आली होते. तर दोन लाभार्थ्यांवर आक्षेप असल्याकारणाने त्या दोन लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी संपूर्ण बाराही यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांचे नाव कमी करण्यात आले. शासकीय नियमानुसार लाभार्थ्यांचे नाव कमी केल्यानंतर त्यांना आक्षेप नोंदवण्यास साठी १५ दिवसांची मुदत दिली जाते. पण सदर यादी ही चक्क दीड महिना प्रकाशित करण्यात आली नाही. सरपंच सचिवांनी ही पात्र व अपात्र यादी ग्रा. प.च्या नोटिस फलकावर लावण्यात आली नाही.त्यामुळे १२ लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात अपील करता आले नाही. जर अपील अर्ज करण्याची संधी मिळाली असती तर आम्हा लाभार्थ्यांची मौका चौकशी झाली असती मात्र ग्रा.पं, मोहझरीच्या तशी परिस्थितीच उद्भवू दिली नाही.प्रशासनाने हे जाणीवपूर्वक कटकारस्थान करून यादी एक दीड महिना दडवण्यात आले असे आक्षेप मोहझरी ग्रामपंचायत येथील अपात्र घरकुल धारकांनी घेतला. गावाचा सरपंच पद हा महत्वपूर्ण असून नेतृत्वात बालिशपणा दिसून येत आहे. असाच व्यक्तिगत आकसापोटी जर अशी चुकीचे निर्णय घेतले गेले तर गावाचा विकास होणार काय ? मात्र या व्यक्तिगत दुभाकीय भावनेने 12 लाभार्थ्यांचे घर गेले हे मात्र सत्य. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ग्रामपंचायतचे सरपंच व संबंधीत अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे. सदर पत्रकार परिषदेत वामन निकुरे, भारत मांदाळे, निकुरे, पैकाजी निकुरे, नीलकंठ सोनूले, शकुंतला सोनुले, प्रेमचंद निकुरे, शोभीनाथ गुरनुले, रवींद्र साहारे, शालिकाराम मोहूर्ले, एकनाथ निकुरे, प्रमोद गुरनुले आदी उपस्थित होते.

सदरील यादी घेऊन आम्ही व ग्रामपंचायत चे सचीव पंचायत समिती कार्यालय आरमोरी येथील बांधकाम विभागाचे अभियंता सलामे साहेब यांना ती यादी दाखविली. त्यांनी त्या लाभार्थ्यांचे घर नमुना 8 अ चा सर्वेक्षण करून घरकुल चे बाराही लाभार्थ्यांचे नाव कपात केले.
मयूर कोडापे, सरपंच, ग्रा. पं. मोहझरी

ग्रा. प. मोहझरी येथील पर्यवेक्षकाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. पक्के घर असल्यामुळे काही लाभार्थ्यांचे घर रद्द करण्यात आले. सदर लाभार्थ्यांचे ग्रा. पं. नमुना 8 अ वर पक्के घर असल्याची नोंद आहे. आपण कुणावरही अन्याय केला नाही. तसेच ग्रा. पं. ठरावावरूनच नाव रद्द केलेली आहेत.
श्री. सलामे बांधकाम अभियंता पं. स. आरमोरी