डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट तर्फे जिजाऊ, सावित्री, रमाई संयुक्त जयंती उत्सव 2022 संपन्न.

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक✒
📱9766445348
हिंगणघाट:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समिती हिंगणघाट यांच्या माध्यमातून जिजाऊ, सावित्री, रमाई संयुक्त जयंती उत्सव नुसताच दीक्षाभूमी सिद्धार्थनगर हिंगणघाट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या एक दिवशीय कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली, त्यानंतर बुद्ध वंदनाचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने घेण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये “वक्तृत्व स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले या वक्तृत्व स्पर्धेचा विषय “थोर महापुरुषांचे सामाजिक कार्य” हे होते. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला, नंतरच्या टप्प्यांमध्ये नाट्यप्रयोग एक नाटिका परिवर्तन रंगमंच हिंगणघाट प्रसेंजित फुलकर यांच्या द्वारे सादर करण्यात आले. पुढील सत्रामध्ये रमाई/भीम/बुध्द गीते यावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले. या या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले परिसंवादाचा विषय “आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती व सामाजिक/राजकीय ऐक्य” या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलभाऊ जवादे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष खंडारे, डॉ. माधुरी झाडे व नम्रता भोंगाडे उपस्थित होत्या. तसेच अशोक भालशंकर, गोरख भगत, ऋषी सुटे, गोकुल पाटील, राजू भगत, मंगला कांबळे, अश्विन तावाडे, विजय झाडे, अनिकेत कांबळे, अनिल मून, अनुताई सोनकुवर, विनोद कांबळे, देवचंद पाटील, संध्या जगताप, अशोक रामटेके, राजू फुलझेले, विनोद कांबळे, पुरुषोत्तम मून, अखिल धाबर्डे, इंजि. निखिल कांबळे, अनुताई मानकर, मा. नलिनी ठमके, मा. प्रमोदींनी नगराळे उपस्थित होते. प्रमुख वक्ते यांनी आपल्या भाषणातून आंबेडकरी चळवळ ची सद्य स्थिती के आहे व सामाजिक/राजकीय ऐक्य कसे साध्य करता येईल या विषयावर विचार व्यक्त केले, तसेच अध्यक्षीय भाषणातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी समाजात जागृती होणे गरजेचे आहे ही विचारधारा पुढे घेऊन आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अस्मिता भगत, प्रास्ताविक अजय सोरदे व आभार प्रदर्शन अजय फुलझेले यांनी केले.
या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केलेले “रमाई एकपात्री नाट्यप्रयोग” 841 वा प्रयोग सादर करण्यात आला. सौ लताताई चंद्रसेन डोंगरे पुलगाव यांनी आपल्या नाट्यप्रयोगतून रमाई चे जीवन चरित्र सादर केले, यानंतर संगीतमय प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला गायक महानंद भगत, गायक सुरेंद्र डोंगरे व गायक संघर्ष थुल यांनी रमाई गीते आणि भीम गीतातून सामाजिक प्रबोधन केले. या एक दिवसीय कार्यक्रमांचे विविध सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुताई सोनकुवर, संध्या जगताप अश्विनी पाटील, अजय सोरदे, निखिल कांबळे तसेच आभार प्रदर्शन दिपक कापसे, प्रशांत जगताप, भारत पाटील, लोकेश रंगारी, प्रशांत सोनकुवर, ललिता पाटील, रसपाल शेंद्रे, अमिता पुनवरकर, वैष्णवी दुर्गे, अजय डांगरे, वनिता चनकापुरे, टीकाराम जवादे, भारत बोदिले, आशिष अंबादे इत्यादींनी केले.
दोन वेळेचे भोजनदान कार्यक्रम मध्ये देवानंद मेश्राम यांनी देखरेख पाहिले. मंडप व सजावट अरुण फुलकर यांनी केले. या सर्व प्रसंगाला आपल्या कॅमेऱ्या मध्ये अनिकेत भैसारे यांनी कैद केले, पुस्तकांचे स्टॉल मधून लाखो रुपयाचा पुस्तकांची विक्री झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खास करून सिद्धार्थ नगर च्या महिला व पुरुषांनी तसेच हिंगणघाट येथील 26 बुद्ध विहारांच्या महिला उपसकांनी सहकार्य केले.