चार चाकी ची नंबर प्लेट मोटारसायकलला ;पेठ पोलिसाचा प्रताप पोलीस अधीक्षक कारवाईचा बडगा उगारणार काय?

66

चार चाकी ची नंबर प्लेट मोटारसायकलला ;पेठ पोलिसाचा प्रताप

पोलीस अधीक्षक कारवाईचा बडगा उगारणार काय?

चार चाकी ची नंबर प्लेट मोटारसायकलला ;पेठ पोलिसाचा प्रताप पोलीस अधीक्षक कारवाईचा बडगा उगारणार काय?

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005

बीड — कलियुगाच वारं सुटलं असतांना नैतिकतेला कूठच थारा राहिला नाही. बीड पोलीस तरी याला अपवाद कसे असतील पेठ बीड पोलिस ठाण्याचा उबाळे नावाचा पोलिस कर्मचारी साहेब असून “दादा” गिरी जोरावर चार चाकी गाडीच्या नावाने रजिस्टर असलेली पासिंग नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटारसायकल ला वापरत असल्याने अशा कर्मचाऱ्यांकडून ” सद् रक्षणाय खलं निग्रहणाय” या ब्रीद वाक्याची इभ्रत कितपत राखली जाणार ? जनतेला न्याय कसा मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
पोलिसांच्या कारनाम्याच्या सूरस वादग्रस्त कहाण्यां मूळे नेहमीच चर्चेचा विषय बनत आले आहेत.आता हेच पहा ना सर्वसामान्य जनतेला कायदा शिकवणारेच कायदा मोडत असतील तर जनतेचे तीन टाक वाजायला कितीसा वेळ लागणार ? पेठ बीड पोलिस ठाण्याचा उबाळे नावाचा कर्मचारी गेल्या एक वर्षापासून बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल वापरत आहे.मग प्रश्न असा पडतो की त्यात काय विशेष! खरी गंमत ही आहे की या गाडीला असलेली एम.एच.23 ए.डी.0923 क्रमांकाची नंबर प्लेट ही चार चाकी गाडीची आहे.ही पासिंग नंबर प्लेट मोटारसायकल सायकलची नाही तर मग ही मोटारसायकल चोरीची आहे
की एखाद्या गंभीर गून्ह्यात आरोपीने वापरलेली आहे हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा बक्कल नंबर देखील 923 आहे.मोठी चार चाकी गाडी गेली कुठे?
एकाच नंबरच्या दोन गाड्या रस्त्यावर धावत असतील व हे कृत्य पोलीस कर्मचारी करत असतील तर कायदा हा सर्वसामान्यांनाच असतो का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे ‌‌.पण या प्रकाराने मात्र पेठ बीड पोलिसांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्न चिन्ह लावले जात आहे.
पोलीस अधीक्षक या प्रकरणी तपास करून काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे