काम दिड लाख रुपयांची असताना ज्यादा रकमेचे बिल जोडुन केली सव्वा दोन लाखाची उचल

58

काम दिड लाख रुपयांची असताना ज्यादा रकमेचे बिल जोडुन केली सव्वा दोन लाखाची उचल

काम दिड लाख रुपयांची असताना ज्यादा रकमेचे बिल जोडुन केली सव्वा दोन लाखाची उचल

*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*

– तीन मुत्रीघरांची मंजुरी असताना सहा मुत्रीघरांच्या बांधकामाचे बिलांची उचल
– गट ग्रामपंचायत पळसगाव येथील प्रकार

*आरमोरी* : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत पाथरगोटा येथे चौदा वित्त आयोग मधुन ३ फायबर मुत्रिघर असे दीड लाख रूपये किमतीचे काम करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने बिलावर अधिक रक्कम टाकून पैशाची उचल केल्याचे उघड झाले आहे.
पाथरगोटा वाशियांच्या सेवेसाठी ३ फायबरचे मूत्रिघर (स्त्री व पुरुष असा एक) पाथरगोटा येथे गट ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये आराखडा तयार करून दीड लाख रूपये किमतीचे काम १४ वित्त आयोग मधुन करण्यात आले. व ३ फायबर मुत्रिघर खरेदी करून पाथरगोटा येथे लावण्यात आले आहेत. मात्र आराखडा नुसार कामाची किंमत दीड लाख रूपये असताना ग्रामपंचायतचे अधिकारी/ कर्मचारी त्या कामामध्ये ७५ हजार एवढी अधिकची रक्कम टाकून पैशाची उचल केली आहे. यामुळे जनमानसात वरचे ७५ हजार रूपये गेले कुणाच्या घशात असा प्रश्न निर्माण करीत असुन असा गैरव्यवहार करुन शासनाच्या व जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम केले जात आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.