आदित्य शिक्षण संस्थेत संत सेवालाल जयंती साजरी
✒श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेच्या विविध कॉलेज मध्ये एकत्रित कोरोना नियम पाळून संत सेवालाल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुंडे, प्रा. भुतडा, प्रा नागरगोजे, डॉ. कचरे, डॉ.पालवे,डॉ. हिमांशू, डॉ. देशपांडे ,डॉ. आखरे यांच्यासह अनेक प्राध्यापक तसेच कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती