महापौरांच्या वार्डातील निविदा घोटाळा,5 दिवसात उघडे पडणार भ्रष्टाचाराचे पितळ – आप

प्रथम तेलंग
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो नंबर 7020016684
चंद्रपूर : आम आदमी पार्टीने उघडकीस आणलेल्या मनपातील 1 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. महापौर यांच्या प्रभागातील वडगाव येथे पूर्वीच बांधकाम झालेल्या कामाची निविदा पुन्हा काढून पुन्हा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गैरव्यवहारा संदर्भात चर्चेत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील संशयास्पद निविदेच्या चौकशी करण्यासाठी आम आदमी पार्टीने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
महानगरपालिका हद्दीतील वडगाव प्रभाग व भानापेठ प्रभाग येथील कॉक्रीट रस्ते, नाल्या, कंपाउंड वाल, पेव्हींग ब्लॉकचे काम, फर्नीचर व पेंटींगचे काम आदी कामांची नविन निविदा १० जानेवारी २०२२ ला काढण्यात आली. तशी रीतसर निविदा जाहीरात वृत्तपत्राला देण्यात आली. सदर कामे ही जवळपास करोडो रुपयांची आहे. या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र वास्तविक ही सर्व कामे याअगोदरच झालेली आहेत. तरी या कामांची नविन निविदा जाहीरात मा.आयुक्त यांचे सहीनीशी काढून महानगरपालिकेने उघड उघड भ्रष्टाचाराचा घाट घालून जनतेच्या करातून गोळा केलेले एक करोड रुपये खिशात घालण्याचा प्रताप सुरु केला आहे.
या निविदा जाहीरातीची व सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी केली होती. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेने सदर निविदा रद्द करून गैरव्यवहारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम आदमी पार्टीने या विरोधात महानगरपालिकेसमोर निषेध नोंदविला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल व आणि अभिप्राय सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे आदेश नगरपरिषद प्रशासन चे प्रादेशिक आयुक्त संघमित्रा डोके यांनी जारी केले आहेत.
हे आपण वाचलंत का?
- लालच…. मोबाईल टॉवर उभारून नागरिकांच्या घटनादत्त अधिकारचे हणन वारंवार तक्रार,निवेदन मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
- राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे व कासवगतीने सुरू
श्री. सुनील देवराव मुसळे , (जिल्हा अध्यक्ष, आम आदमी पार्टी , चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रार निवेदन पत्रान्वये “यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचे पुन्हा नव्याने निविदा काढून जवळपास एक करोड़ रुपये भ्रष्टाचाराद्वारे हडपण्याची चंद्रपूर मनपा ची तयारी” या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त यांचे निर्देशान्वये विषयांकित प्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून तक्रारकर्ता यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याबाबत प्रत्यक्ष सखोल चौकशी , तपासणी करावी व याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह लेखी अहवाल ७ ( सात ) दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विषयांकित प्रकरणात जातीने लक्ष देवून चौकशी व सखोल तपासणीची कार्यवाही पूर्ण करून वस्तुनिष्ठ सविस्तर चौकशी अहवाल प्राप्त करून घेण्याकरिता समिती गठीत करण्यात येत आहे . गठीत समिती मधील अधिकाऱ्यांत श्रीमती विद्युत वरखेडकर (अप्पर जिल्हाधिकारी , चंद्रपूर), श्री. अशोक मातकर, (मुख्य वित्त व लेखाधिकारी , जिल्हा परिषद , चंद्रपूर), श्री. सुनील कुंभे, (कार्यकारी अभियंता , सा.बां . वि.क्र . 1. चंद्रपूर), श्री. विजयकुमार सरनाईक, (मुख्याधिकारी , नगर परिषद , बल्लारपूर) यांचा समावेश आहे.
उपरोक्त प्रकरणाचे अनुषंगाने समितीने आदेशाचे दिनांकापासून 5 दिवसांत मौका चौकशी करून सविस्तर चौकशी अहवाल आपले अभिप्रायासह या कार्यालयास सादर करावे , असे सूचित करण्यात आले आहे. या चौकशीअंती सत्ताधारी भाजप आणि पालिका अधिकाऱ्यानी केलेल्या मिलीभगत भ्रष्टाचाराचे पितळ उघडे होईल, असे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सुनील मुसळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे..यावेळी कोषाध्यक्ष भिवराज सोनी युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार शहर सचिव राजू कुडे एडवोकेट सुनिता पाटील एडवोकेट राजेश विरानी सूर्यकांत चांदेकर तथा इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.